विजया गड्डे या महिलेनं केलं ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट सस्पेंड

टीम ई सकाळ
Monday, 11 January 2021

अमेरिकेत गेल्या बुधवारी इलेक्टोरल मतांच्या मोजणीवेळी हिंसाचार झाला. यामुळे ट्रम्प यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने त्यांचे खाते सस्पेंड केले आहे.

न्यूयॉर्क - अमेरिकेत गेल्या बुधवारी इलेक्टोरल मतांच्या मोजणीवेळी हिंसाचार झाला. यामुळे ट्रम्प यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने त्यांचे खाते सस्पेंड केले आहे. ट्रम्प यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी सातत्यानं ट्विटरचा वापर केला. त्यांच्या चिथावणीखोर आणि खोट्या वक्तव्यांमुळे ट्विटरने त्यांचं खातं सस्पेंड केलं. हा निर्णय घेण्यात भारतीय वंशाची विजया गड्डे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. 

विजया यांनीच ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट कायमस्वरुपी सस्पेंड करण्यात आल्याचं सांगितलं होतं. ट्विटरने शुक्रवारी पहिल्यांदा ट्रम्प यांचे ट्विटर हँडल सस्पेंड केलं होतं. कंपनीचं म्हणणं आहे की, ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून अमेरिकेच्या संसदेत आंदोलकांना भडकावलं होतं.

हे वाचा - चीन नरमला; कोरोना उत्पत्तीविषयी अभ्यास करणाऱ्या WHO टीमला दिली देशात एंट्री

ट्रम्प यांचे ट्विटर सस्पेंड केल्यानंतर विजया यांनी सांगितलं की, भविष्यात पुन्हा अशा घटना पुन्हा घडण्याचा धोका आहे यासाठी ट्रम्प यांचे अकाउंट कायमचं बंद करण्यात आलं आहे. विजया कंपनीच्या अधिकृत, पॉलिसी अँड ट्रस्ट आणि सुरक्षा विभागाच्या हेड आहेत. त्यांनी कंपनीच्या पॉलिसीबाबतही माहिती दिली होती. 

विजया यांचा जन्म भारतात झाला होता. लहान असतानाच त्या कुटुंबासह अमेरिकेला गेल्या होत्या. त्यांचे वडील मेक्सिकोतील एका ऑइल रिफायनरीमध्ये केमिकल इंजिनिअर होते. विजया यांनी न्यू जर्सीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानतंर ग्रॅज्युएशन कार्नेल युनिव्हर्सिटी आणि न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी लॉ स्कूलमधून केलं. जवळपास दहा वर्षे एका लॉ फर्ममध्ये काम केल्यानंतर 2011 मध्ये त्यांनी कॉर्पोरेट लॉयर म्हणून कामाला सुरुवात केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijaya gadde behind donald trump twitter account suspension