Cleaning Viral News : म्हणून साफसफाई करायला हवी..! कुटुंबाला घर साफसफाईत हाती लागलं घबाड...

नुकतंच एका माणसाला घर साफसफाईत स्वप्नातही विचार केला नाही एवढं मोठं घबाड हाती लागलं.
Cleaning Viral News
Cleaning Viral Newsesakal

A Man Found Millions In Cleaning His Home : अचानक धनलाभाचा योग कशाला म्हणतात ते ही बातमी वाचून समजते. पूर्वीचे लोक घराच्या फरशांमध्ये, भींतींमध्ये खजाना लपवून ठेवायचे असं ऐकलं होतं, पण तसं प्रत्यक्षात कधी बघितलंय? जर असा अचानक धनलाभ तुम्हाला झाला तर? सध्या व्हायरल होत असलेल्या बातमी नुसार एका कुटुंबासोबत असं घडलं आहे.

त्या कुटुंबाला घर साफसफाईत पैशांनी भरलेल्या अनेक बॅग मिळाल्या. ज्यात साधारण १० लाख जूने कॉइन्स मिळाले. ज्यांना हे घबाड लागलं त्या जॉन रेयेस त्यांना आपल्या सासरच्या घरी साफसफाई करताना ते मिळालं. या सर्व बॅग्ज सीलबंद होत्या.

ही घटना अमेरिकेच्या लॉस एंजिल्सची आहे. जॉनने सांगितलं की, घरात असं सगळं झाल्यावर काही जून्या कॉइन कलेक्टर्सने माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की, हे कॉईन्स किमान ४० वर्षांपेक्षा जूने आहेत. काही कॉईन कलेक्टर्सने सांगितलं की, जोवर या कॉईन्सविषयी सगळी माहिती मिळत नाही तोवर त्यांना विकता येऊ शकत नाही.

कॉईन्सविषयी

न्यूयॉर्क पोस्टनुसार कुटुंबाने सांगितले की, हे कॉईन्स झिंकचे नसून तांब्याचे आहेत. ज्याला USA ने १९८० मध्ये बदललं होतं. यावरूनच अंदाज लावतो येतो की, हे किमान ४० वर्ष जूने आहेत. रेयेसने २५ हजार डॉलर्सला (साधारण २० लाख रुपये) हे कॉईन्स एका रिसेल वेबसाइटवर विक्रीसाठी नोंदवले आहेत.

Cleaning Viral News
Society Rules Viral News : सोसायटीचा अजब नियम, नो लुंगी, नो नायटी.., आता रहिवाशांना ड्रेस कोड!

घराच्या डागडूजीत सापडले ५० लाख रुपये

मागच्या काही महिन्यातही अशीच बातमी आली होती की, स्पेन मधल्या लुगो सिटीत घराची डागडूजी करताना हाती खजाना लागला. एका झटक्यात व्यक्ती मालामाल झाला. त्याला ५० लाख रुपयांना धनलाभ झाला. पण ते कोणीही वापरू शकले नाही. त्यानेच स्वतः त्याची कहाणी सांगितली.

काही मिनीटांतच खजान्याचा आनंद हिरावला

मिरर युके च्या रिपोर्टनुसार तोनो पायनिरो नावाच्या व्यक्तीने स्पेनमध्ये घर खरेदी केलं. घराची डागडूजी करताना भींतीत काही डबे मिळाले. जेव्हा पायनिरोने ते चेक केले तेव्हा त्याची शुद्धच हरपली. कारण या डब्यांमध्ये कॅश भरलेली होती. ज्याची किंमत साधारण ४८ लाख १४ हजार रुपये होती. पण पायनिरोचा हा आनंद क्षणभंगूर ठरला. कारण त्याला मिळालेली स्पॅनिश करंसी आता चलनात नाही. ती १८६८ ते २००२ दरम्यान चलनात होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com