Viral: भोपळ्यापासून बनलेली बोट पाहिली आहे का? फोटो पाहून वाटेल आश्चर्य

बरेचजण त्यांच्या किंवा त्यांच्या जवळील खास व्यक्तीचा वाढदिवस खास बनवण्यासाठी वेगवेगळ गोष्टींची शक्कल लढवत असतात.
 pumpkin boat
pumpkin boatSakal

Trending Pumpkin Boat : बरेचजण त्यांच्या किंवा त्यांच्या जवळील खास व्यक्तीचा वाढदिवस खास बनवण्यासाठी वेगवेगळ गोष्टींची शक्कल लढवत असतात. सध्या अशाच एका गोष्टीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्यक्तीने स्वतःचा वाढदिवस खास बनवण्यासाठी खास भोपळ्यापासून बनवलेल्या बोटीचा वापर केला आहे. सध्या या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, ही शक्कल अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.

 pumpkin boat
मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

भोपळ्याची बोट ऐकायला आणि बघायला जरी विचित्र वाटत असले तरी हे खरे आहे. युनायटेड स्टेट्सच्या नेब्रास्का येथे राहणार्‍या डुआन हॅन्सनने स्वताचा वाढदिवस भोपळ्याच्या बोटीवर नदीत प्रवास करून साजरा केला असून, ज्याचे फोटो त्याने स्वतः फेसबुकवर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल

 pumpkin boat
धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

हॅन्सनला करायचा आहे विक्रम

हॅन्सनने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तो भोपळ्यापासून बनवलेल्या खास बोटीला नदीत घेऊन जाताना आणि नंतर त्यावर स्वार होताना दिसत आहे. अशा प्रकारच्या बोटीतून प्रवास करून हॅन्सनला स्वतःच्या नावावर विक्रम करण्याची इच्छा आहे. ओहायो दौर्‍यावर असताना हॅन्सनला ही कल्पना सुचली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com