प्रेमाने मागाल तर, अर्ध्या किमतीतही देऊ; हॉटेल चालकाच्या ऑफरची सर्वदूर चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेमाने मागाल तर, अर्ध्या किमतीतही देऊ; हॉटेल चालकाच्या ऑफरची सर्वदूर चर्चा

प्रेमाने मागाल तर, अर्ध्या किमतीतही देऊ; हॉटेल चालकाच्या ऑफरची सर्वदूर चर्चा

Hotel Offer For Customer : ग्राहकांना नम्रता आणि सभ्यतेचे महत्त्व समजावे यासाठी एका हॉटेल चालकाने कंबर कसली आहे. यासाठी या व्यक्तीने एक बोर्डदेखील लावला असून, सध्या सगळीकडे याच कॅफे चालकाची आणि त्याने दिलेल्या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: International Tea Day टपरीवरचा कटींग असो की अमृततुल्‍यचा कप: 'चहाप्रेमी असाल तर वाचाच..चहाचे किती हे प्रकार

चर्चा होणारा हा बोर्ड आणि ही ऑफर भारतातील नव्हे तर, यूकेच्या एका कॅफेतील आहे. लोकांमध्ये नम्रता आणि सभ्यता यावी यासाठी हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कॅफेचे मालक उस्मान हुसेन यांनी त्यांच्या प्रेस्टन येथील एका कॅफेमध्ये हा बोर्ड लावला आहे. ज्यावर ग्राहकाने प्रेमाने चहाची ऑर्डर दिली तर, चहासाठी येथे अर्धेच पैसे द्यावे लागतात. तर, अखडून आणि मोठ्या आवाजात ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांना चहासाठी दुप्पट पैसे मोजावे लागतात.

हेही वाचा: Instagram Reels : भारतीयांसाठी Instagram ची खास दिवाळी ऑफर, रील्स बनवा अन्...

रिपोर्ट्सनुसार, या कॅफेमध्ये मिळणाऱ्या 'देसी चहा'ची किंमत 5 पौंड (जवळपास 460 रुपये) ठेवण्यात आली आहे. मात्र, जर तुम्ही प्रेमाने चहाची ऑर्डर दिली तर, त्यांच्यासाठी या चहाची किंमत केवळ 3 डॉलर म्हणजे 275 रुपये इतकीच ठेवण्यात आली आहे. याही पेक्षा प्रेमाने चहाची ऑर्डर दिली तर ही किंमत आणखी घसरून 1.90 डॉलर म्हणजेच अंदाजे 175 पर्यंत द्यावी लागेल. ग्राहकांना केवळ नम्रता आणि सभ्यतेचे महत्त्व कळावे यासाठी अशा स्वरुपाची ऑफर ठेवण्यात आल्याचे कॅफेचे मालक उस्मान हुसेन सांगतात.

हेही वाचा: Samsung Offer : सॅमसंगचा 5G फोल्डेबल फोन ८१ हजारांनी स्वस्त; ऑफर काहीच तास

फलक पाहून ग्राहकांचा मूडच बदलला

हुसैन यांनी त्यांच्या कॉफी शॉपमध्ये लावलेल्या फलक वाचून अनेक ग्राहकांचा बोलण्याचा मूडमध्ये फरक आला आहे. या बोर्डमुळे ग्राहक खुल्या मनाने येऊ लागले आहेत. तसेच हसून आणि नम्रतेने बोलू लागले आहेत असे हुसैन म्हणाले.

टॅग्स :TeaDiscount Offer