Video: पर्यटकांच्या वाहनामध्ये चक्क सिंह घुसला, पुढे काय झाले, पहा | Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral

Video: पर्यटकांच्या वाहनामध्ये चक्क सिंह घुसला, पुढे काय झाले, पहा

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. कधी पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ तर कधी जंगली प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येतात. कधी हे व्हिडीओ हिंसक असतात तर कधी मजेशीर पण सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक सिंह पर्यटकांच्या चक्क वाहनामध्ये घुसलाय. हा व्हिडीओ पाहून काही वेळासाठी तुमच्याही अंगावर काटा येईल पण त्यांनंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. (viral video - a lion enters in tourist car and then watch what happened)

हेही वाचा: कर्जदार देशांच्या बचावाची गरज

या व्हिडीओमध्ये एक सिंह पर्यटकांच्या वाहनामध्ये शिरताना दिसत आहे. सुरवातीला हे पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. पण सिंह पर्यटकांच्या वाहनात घुसल्यानंतर जे व्हिडीओत दिसतं ते पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल. सिंह चक्क एका पर्यटकाच्या अंगावर जाऊन त्याला मिठी मारताना दिसत आहे. तर व्हिडीओमध्ये पर्यटक सिंहाची पाठ थोपटताना दिसत आहेत.

हेही वाचा: युक्रेनच्या प्रत्युत्तराने रशियाची पीछेहाट

सिंहाला समोर पाहून कोणीही घाबरतो सिंहाच्या नजरेपासून प्रत्येकजण वाचण्याचा प्रयत्न करतो. अनेकांना तरसिंहाची डरकाळी ऐकूनच घाम फुटतो पण या व्हिडीओत सिंहाची कृती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Web Title: Viral Video A Lion Enters In Tourist Car And Then Watch What Happened

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :viralglobal newsVideolion
go to top