Russia Ukraine War : युक्रेनच्या प्रतिहल्ल्यांनी रशिया बेजार

युद्धाला दोनशे दिवस पूर्ण; रशियाची अनेक ठिकाणांहून माघार
Volodymyr Zelenskyy Russia Ukraine s counterattacks america weapons
Volodymyr Zelenskyy Russia Ukraine s counterattacks america weapons sakal

किव्ह : अमेरिकेकडून मिळत असलेल्या शस्त्रबळाच्या जोरावर युक्रेन करत असलेल्या प्रतिहल्ल्यांमुळे रशियाचे सैनिक बेजार झाले असून दक्षिण आणि पूर्वेकडील अनेक भागांमधून त्यांनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या या युद्धाला आज दोनशे दिवस पूर्ण झाले असून ताब्यात घेतलेला भाग हातातून निसटत असल्याने रशियाला धक्का बसला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

फेब्रुवारीमध्ये हल्ला केल्यानंतर काही दिवसांतच युक्रेनचा ताबा हातात येण्याची अपेक्षा असलेल्या रशियाला युक्रेनी सैनिकांच्या चिवट प्रतिकारामुळे आणि उर्वरित जगाने टाकलेल्या निर्बंधांमुळे मर्यादित यश मिळाले आहे. युद्धाला सहा महिने उलटून गेल्यानंतरही रशियाला युक्रेनचा पूर्वेकडील भाग आणि दक्षिणेकडील काही भाग ताब्यात घेता आला आहे. मात्र, युक्रेनी सैनिकांनी ऑगस्टच्या अखेरपासून सुरु केलेल्या प्रतिहल्ल्यांमुळे हा ताब्यात आलेला भागही आता रशियाच्या हातून निसटून चालला असल्याचे चित्र आहे. युक्रेनी सैनिकांनी केलेल्या जोरदार हल्ल्यामुळे रशियावर खारकिव्ह या मोठ्या शहरातून सैन्यमाघारी जाहीर करण्याची नामुष्की ओढविली आहे.

झॅपोरिझ्झिया प्रकल्प बंद

युरोपमधील सर्वांत मोठा अणुप्रकल्प असलेला झॅपोरिझ्झिया प्रकल्प बंद करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या परिसरातच मोठ्या प्रमाणावर बाँबहल्ले सुरु असल्याने किरणोत्सर्ग टाळण्यासाठी हा प्रकल्प बंद करण्यात आला असल्याचे या प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

युक्रेनचे वाढते बळ

युद्धात युक्रेनच्या तुलनेत रशियाची अधिक लष्करी हानी झाली आहे. युक्रेनचे आतापर्यंत नऊ हजार सैनिक मारले गेले असले असून रशियाने त्यांचे २५ हजार सैनिक गमावले आहेत. याशिवाय, रशियाचे शेकडो रणगाडेही उद्ध्वस्त झाले आहेत. रशियाच्या हल्ल्याला विरोध म्हणून अनेक युक्रेनी नागरिक लष्करात भरती झाले असल्याने युक्रेनकडे सध्या दहा लाखांच्या आसपास सैनिक आहेत. उलट, लष्करभरती करण्याचा निर्णय अंगलट येण्याची भीती असल्याने रशियाला मर्यादित सैनिकांसह युद्ध लढावे लागत आहे. शिवाय, युक्रेनला अमेरिकेकडून अव्याहत शस्त्रपुरवठा होत असल्याने युक्रेनचे बळ वाढत आहे.

रशियाकडून सुमारे दोन हजार चौ. किमी. भूप्रदेश आम्ही परत मिळविला आहे. रशियन सैनिक आम्हाला आता पाठ दाखवित आहेत. अर्थात, पळून जाण्याचा त्यांनी स्वीकारलेला पर्याय योग्यच आहे.

- व्होलोदीमिर झेलेन्स्की, अध्यक्ष, युक्रेन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com