किव्ह : रशियाकडून युक्रेनवर बाँबवर्षाव करण्यात येत आहे. क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये विजेचे संकट निर्माण झाले आहे. युद्ध सुरू असलेल्या भागातील सुमारे ४० लाख नागरिकांना विजेशिवाय राहावे लागत आहेत, असा दावा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी (ता.२८) केला. ते म्हणाले, ‘‘देशातील वीज यंत्रणांवर रशिया सातत्याने हवाई हल्ले करीत असून वीज यंत्रणेचे नुकसान झाले आहे. यामुळे सुमारे ४० लाख लोकांना अंधारात जीवन जगावे लागत आहे. युक्रेनमधील विजेच्या पायाभूत सुविधांची नासधूस होण्याचा धोका लक्षात घेऊन किव्हमधील प्रशासनाने वीज खंडित होण्याचा इशारा आधी दिला होता. हे वीज संकट दूर करण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत.’’
युक्रेनच्या वीज व्यवस्थेला लक्ष्य करून रशिया क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले करीत आहे. किव्हवर केलेल्या हल्ल्यांमुळे वीज पुरवठा साखळीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे किव्हसह अन्य शहरांमधील वीज पुरवठा यंत्रणा नादुरुस्त झाल्या आहेत.
विजेचा वापर कमी करण्याचे आवाहन
रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेन सरकारने विजेचा वापर कमी करण्याचे आवाहन नागरिकांना यापूर्वीच केले होते. देशात अनेक ठिकाणी वीज कपात करण्यात आली आहे. रशियाने काही दिवसांपासून युक्रेनच्या पाणी व वीज पुरवठा यंत्रणांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले वाढविले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.