#BoycottMalaysia : भारताच्या भूमिकेने मलेशिया नरमली!

वृत्तसंस्था
सोमवार, 20 जानेवारी 2020

भारतासारखा मोठा आयातदार देश शोधणे किंवा पाम तेलाची विक्री कायम ठेवणे मलेशियासाठी आव्हानात्मक आहे.

लँक्वी, मलेशिया : सुधारित नागरिकत्व कायदा, काश्मीरविषयक भारताचे धोरण यावर सातत्याने टीका करणारे मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद चांगलेच नरमले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताने मलेशियामधून येणाऱ्या पाम तेलावर मोठ्या प्रमाणात आयात कर आकारल्याने मलेशियातून आलेले तब्बल 30 हजार टन भारतीय बंदरांवर पडून आहे. त्यामुळे भारताने अप्रत्यक्षपणे टाकलेल्या आर्थिक निर्बंधांवर प्रत्युत्तर म्हणून आपण काहीही करू शकत नसल्याचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी म्हटले आहे.

- ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग कारवाई कोठे चालणार वाचा

तसेच भारतासारख्या विशाल अर्थव्यवस्थेसमोर मलेशिया कुठेही टिकणार नाही. त्यामुळे आपण प्रत्युतरादाखल कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्याला यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधावा लागेल, असं ते म्हणाले. वृत्तसंस्था रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

- हरीश साळवे ब्रिटनच्या राणीचे वकील

काश्मीरविषयक भारताच्या धोरणावर टीका केल्याबद्दल भारताने तुर्की आणि मलेशियाकडून होणाऱ्या आयातीवर मोठ्या प्रमाणात आयात कर आकारले आहेत. भारत मलेशियातून खाद्यतेल, नैसर्गिकवायू आणि इतर उत्पादनांची आयात करतो. तर तुर्कीमधून देखील तेल आणि स्टील उत्पादनांची आयात होते. मलेशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पाम तेलाचे उत्पादन करणारा तसेच निर्यातदार देश आहे.

- Happy Birthday : अजित दोवालांविषयी या गोष्टी माहितीच हव्यात!

तर भारत दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे. अशावेळी मलेशियामधून होणारी आयात कमी केल्याने मलेशियाला मोठा फटका बसला आहे. मागील आठवड्यात मलेशियन पाम तेलाचे दर 10 टक्क्यांनी घसरले होते, जी गेल्या 11 वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे.

भारतासारखा मोठा आयातदार देश शोधणे किंवा पाम तेलाची विक्री कायम ठेवणे मलेशियासाठी आव्हानात्मक आहे. परिणामी, एरव्ही भारतावर सातत्याने टीका करणारे महातिर मोहम्मद आर्थिक नाड्या आवळल्या गेल्याने हतबल झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We are too small to take retaliatory action says Malaysian PM on Indias palm oil boycott