esakal | अफगाणबाबत व्यावहारिक दृष्टिकोन हवा
sakal

बोलून बातमी शोधा

afganisthan

अफगाणबाबत व्यावहारिक दृष्टिकोन हवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद (पीटीआय): युद्धग्रस्त अफगाणिस्तानची स्थिती बिकट बनली असली तरी जगाने त्याकडे जुन्या चष्म्यातून पाहणे सोडून द्यायला हवे आणि व्यावहारिक दृष्टीकोन बाळगून पुढे जायला हवे, असे मत आज पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी मांडले.

हेही वाचा: गुगलकडून अफगाण सरकारचे ई-मेल ‘लॉक’

पाकिस्तानने आज अफगाणबाबत शेजारी देशांची आभासी बैठक बोलावली होती. यात चीन, इराण, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकीस्तान या शेजारील देशांचा समावेश होता. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुरेशी होते.

हेही वाचा: अफगाणिस्तानबाबत भारत-रशियाला चिंता

ते म्हणाले, की अफगाणिस्तानची स्थिती बिकट आहे. परंतु देशातील राजकीय परिस्थिती लवकरच स्थिर होईल आणि वातावरण सर्वसामान्य होईल. अफगाणिस्तानातील नवे वास्तव स्वीकारावे लागेल. जुन्या दृष्टीकोनातून पाहणे सोडून देणे गरजेचे असून व्यावहारिक दृष्टीकोन अंगिकारत पुढे जाण्याची गरज आहे. कुरेशी म्हणाले, की तेथील नागरिकांचे कल्याण करणे हाच आपला मुळ उद्देश आहे. सूत्राने म्हटले की, बैठकीत सहभागी झालेल्या देशांनी सीमा सुरक्षित राहण्यासाठी देशात शांतता प्रस्थापित करणे, दहशतवादाचा धोका कमी करणे, निर्वासितांना मायदेशी पाठवणे, आर्थिक स्थिरता आणि जीवनमान उंचावणे आणि तसेच दळणवळण वाढवण्यावर सहमती दर्शविली.

loading image
go to top