
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता निवळला आहे. भारताने घातलेल्या अटींनुसार शस्त्रसंधी करण्यात आलीय. दरम्यान, आता पाकचा नापाक चेहरा उघड होत आहे. पाकिस्तानी लष्कराने पत्रकार परिषदेत माहिती देताना पुलवामा हल्ल्याचा उल्लेख केला. यात लष्करी अधिकाऱ्याने पुलवामावेळी आम्हाला टॅक्टिकल यश मिळाल्याचं म्हटलंय. आतापर्यंत पाकिस्तानकडून पुलवामासह इतर दहशतवादी हल्ल्यात आमची भूमिका नसल्याचा दावा केला जात होता. पण या पत्रकार परिषदेत त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे.