Golden Blood Group: देवतांचा ब्लड ग्रुप माहितीये काय? जगभऱ्यात फक्त 45 लोकांकडे; जाणून घ्या वैशिष्ट्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Golden Blood Group

Golden Blood Group: देवतांचा ब्लड ग्रुप माहितीये काय? जगभऱ्यात फक्त 45 लोकांकडे; जाणून घ्या वैशिष्ट्य

Rare Blood Group: समज आल्यापासनं तुम्हाला जेव्हा ब्लड ग्रुप्सचे नाव कळले तेव्हा ते A+, A-, B+,B-, O-, AB+, AB- नक्कीच या गटांपैकीच काही असतील. मात्र देवतांचा गोल्डन ब्लड ग्रुप तुम्ही कधी ऐकला काय? शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांच्या मते, हा ब्लड ग्रुप जगातील सर्वात दुर्मिळ ब्लड ग्रुप असतो. त्याचा उल्लेख 'Rarest Blood Group' असाही केला जातो. जाणून घेऊया या दुर्मिळ ब्लड ग्रुपबाबत.

काय आहे गोल्डन ब्लड ग्रुप?

सायंन्स म्युझियम ग्रुपमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालुसार, प्राचीन ग्रीसमध्ये अशी मान्यता होती, की देवतांच्या शरीरात सोनेरी रक्त वाहतं. त्यालाच सोन्याचं रक्त असेही म्हटले जायचे (Golden Blood). हे द्रव त्यांना अजरामर ठेवत होतं असं मानलं जायचं. पण, सर्वसामान्य व्यक्तींच्या शरीरात मात्र हे द्रव विषारी समजलं जात होतं.

1961 मध्ये पहिल्यांदाच गोल्डन ब्लड, अर्थात सोनेरी रक्तगट असणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला. अतिशय दुर्मिळ असल्यामुळं या रक्तगटाला Golden Blood Group असं नाव देण्यात आलं. मात्र सर्वसामान्यांपासून हे संशोधन बराच काळ लपवून ठेवण्यात आलं होतं. पण, आता जेव्हा संपूर्ण जगासमोर या रक्तगटाची माहिती पोहोचली आहे तेव्हा अनेकजण आश्चर्यचकीत झालेत.

हेही वाचा: Blood Pressure: तुम्हालाही सतत BP चा त्रास होतो? रोज खा शेवग्याच्या शेंगा

या रक्तगटाचे सायंटिफिक नाव 'Rhnull' असे आहे. संयुक्त राष्ट्राकडून नुकत्याच आलेल्या माहितीनुसार जगाची लोकसंख्या 8 अब्ज एवढी झाली आहे. मात्र एवढ्या अवाढव्य लोकसंख्येमध्ये अवघ्या 45 लोकांमध्ये हा रक्तगट आढळून येतो.

हेही वाचा: Winter Health Tips : हिवाळ्यात व्हायरल इन्फेक्शनची भीती वाटते? खा फक्त ही एक गोष्ट

रक्तगट दुर्मिळ असण्याचे कारण

या रक्तगटात असणारे जीवन रक्षक गुण अद्वितीय आहेत. कोणत्याही व्यक्तीस रक्ताची कमतरता भासल्यास गोल्डन ब्लड देता येतं. सध्या हा रक्तगट फक्त 45 लोकांमध्ये आढळून आला. आणि त्यातूनही अवघे नऊ लोकच रक्तदान करण्यास समर्थ आहेत.

हेही वाचा: High Blood Pressure in women : उच्च रक्‍तदाब ठरतोय महिलांचा शत्रू

हा रक्तगट सोन्याहून महाग

रूग्णालयांमध्ये रक्ताची गरज भासल्यास ब्लड बँकमधून रक्त दिल्या जातं. पण गोल्डन रक्तगटासाठी भरभक्कम रोकड मोजणाऱ्यांची कमी नाही. या रक्तगटाची किंमत एक ग्राम सोन्याहूनही जास्त आहे.

हेही वाचा: Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

हा रक्तगट जेनेटिक म्युटेशनमुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतो. चुलत भावंड किंवा तत्सम नात्यांमध्ये लग्न झाल्यास हा रक्तगट पुढे जाऊ शकतो. या रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये anemia चा धोका वाढतो. सुरक्षेचा संदर्भ लक्षात घेता या मंडळींची ओळख जाहिर केल्या जात नाही.