
कॅथोलिक ख्रिश्चन धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी (२१ एप्रिल २०२५) वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. कार्डिनल केविन फॅरेल यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली. एक दिवस आधी, पोपने व्हॅटिकनच्या दोन अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. शुभचिंतकांच्या प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले. यानंतर आता पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांबाबतच्या चर्चा तीव्र झाल्या आहेत. यासाठी अनेक प्रमुख कार्डिनल्सना संभाव्य उमेदवार म्हणून विचारात घेतले जात आहे.