निर्यात बंदी! युरोपीयन बाजारपेठेत गव्हाच्या किमती गगनाला भिडल्या

wheat export
wheat exportsakal

पॅरिस : दोन दिवसांपूर्वी गव्हाच्या निर्यातीवर भारत सरकारने निर्बंध लागू केले असून, भारताच्या या निर्णयाचा फटका आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणवून लागला आहे. दरम्यान, निर्यात बंदीच्या निर्णयानंतर सोमवारी गव्हाच्या किमती विक्रमी उच्चाकांवर पोहचल्या असून, युरोपीयन बाजारात गव्हच्या किमती 435 युरो (453 युरो) प्रति टनवर गेल्या आहेत. त्यामुळे आधीच रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईने त्रस्त नागरिकांना आता आणखी झळ बसणार आहे. (Wheat prices hit record high after India export ban)

भारताने दोन दिवसांपूर्वीच गव्हाच्या निर्यातीवर तत्काळ बंदी (India Wheat Export Ban) घातली आहे. अन्न-धान्याच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी ही निर्यात रोखण्यात आल्याचे सरकारकडून सागंण्यात आले आहे. दरम्यान, भारताच्या या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे G7 देशांनी भारताच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. याला केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी ट्वीट करून उत्तर दिले आहे.

पुरी म्हणाले की, भारतात गहू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. भारताच्या अन्नसुरक्षेवर लक्ष केंद्रित करून अन्नधान्याच्या किंमती नियंत्रित ठेवणे आणि बाजारातील साठेबाजीचा प्रश्न सोडविण्यासाठी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शेजारी देश आणि संकटात असलेल्या देशांच्या अन्न-धान्यासंबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी भारत समर्थ आहे, असंही हरदीपसिंग पुरी यांनी ट्वीटमध्ये स्पष्ट केले आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचाही परिणाम

गेल्या फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. यामध्ये गव्हाचाही समावेश आहे. त्यात आता भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे रशिया-युक्रेनच्या यु्द्धामुळे वाढलेल्या महागाईत नागरिकांना आता गव्हाच्या वाढत्या किमतींनाही तोंड द्यावे लागणार आहे. एखादा देश निर्यातीवर निर्बंध घालत असेल किंवा बाजार बंद करत असेल तर, महागाईचं संकट आणखी वाढू शकतं, असं मत जर्मन कृषीमंत्री ओजडेमिर यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना म्हटले होते. याबाबत एएफपीने वृत्त प्रकाशित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com