कोरोनामुळे जागतिक आरोग्य संघटनेला आलंय 'या' गोष्टीचं टेन्शन!

वृत्तसंस्था
बुधवार, 4 मार्च 2020

मास्क आणि अन्य उत्पादनांची लोकांकडून साठेबाजी होणे साहजिक आहे.

जीनिव्हा : कोरोना विषाणूंचा जगभरात वेगाने प्रसार होत असतानाच या विषाणूच्या प्रतिबंधात्मक साहित्याची टंचाई भासू लागल्याने जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. मास्क, गॉगल्स आणि अन्य उपकरणांच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आरोग्य संघटनेने सावधगिरीचा इशारा दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

या सर्वच उपकरणांची मागणी वाढू लागली असून, त्याचा काळाबाजार आणि टंचाई निर्माण होण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडरॉस घेबरायसूस यांनी जीनिव्हामध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आरोग्य कर्मचाऱ्यांचा बचाव केल्याशिवाय आपल्याला हा विषाणू रोखता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- कोरोनामुळं गुगल-ट्विटरनं कर्मचाऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

मास्क आणि अन्य उत्पादनांची लोकांकडून साठेबाजी होणे साहजिक आहे. लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असल्यानेच त्यांनी हा मार्ग स्वीकारल्याचे घेबरायसूस यांनी स्पष्ट केले. 

- Coronavirus : भारतात वाढताहेत कोरोनाचे रुग्ण; रुग्णांची संख्या...

जगभरातील कोरोनाचे अपडेट्स :

- चीनमध्ये एक व्यक्ती, एक टेबल धोरण 
- कोरोनामुळे चीनमधील लघू उद्योग झोपले 
- अर्जेंटिना, चिलीमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडले 
- फ्रान्समध्ये मास्कचा मोठा तुटवडा 
- ब्रिटनमध्ये रुग्णांशी डॉक्टरांचे व्हिडिओ चॅट 
- चलनी नोटांमधून विषाणूंचा प्रसार शक्य : आरोग्य संघटना 
- ब्रिटनमधील लंडन बुक फेअर रद्द 
- आफ्रिकी विमान कंपन्यांना हजारो डॉलर्सचा फटका 
- इराणमधील मृतांची संख्या ९२ वर

- Coronavirus : कोरोनाच्या धसक्याने कारागृह केले रिकामे; 54 हजार कैद्यांना दिले सोडून!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WHO calls on industry and governments to increase manufacturing of corona protective equipments