भारतीय वंशाची महिला अमेरिकन उपराष्ट्रपती होणार? जाणून घ्या कोण आहेत कमला हॅरीस....

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 12 August 2020

कमला हॅरीस या पहिल्या भारतीय आणि आशियायी वंशाच्या व्यक्ती आहेत ज्यांना अमेरिकेतील उपराष्ट्रपती पदाचे तिकीट मिळाले आहे.

वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाचे तिकीट मिळवून मोठा इतिहास रचला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडन यांनी  मंगळवारी हॅरीस यांची निवड केली.  सध्या कमला हॅरीस या कॅलिफोर्नियामधून अमेरिकेन सिनेटर नियुक्त आहेत. महत्वाचे म्हणजे अमेरिकेतील मुख्य पक्षाकडून उपराष्ट्रपती पदाचे तिकीट मिळवणाऱ्या कमला हॅरीस या पहिल्या आशियायी-अमेरिकन नागरिक ठरल्या आहेत. मागील वेळेस हॅरीस या राष्ट्रपती पदासाठी रिंगणात होत्या. मात्र पाठिंबा न मिळाल्याने त्या बाहेर पडल्या होत्या.  

हे वाचा - रशियाची कोरोनावरील लस भारताला मिळणार का?

उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारपदी निवड झाल्यावर जो बायडन यांनी ट्विटरवरुन ट्विट करुन हॅरीस यांचं अभिनंदन केले आहे.  ट्विटमध्ये बायडन यांनी कमला हॅरीस यांची पक्षाकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारपदी निवड झाल्यामुळे मला अभिमान असून तसेच त्या लढवय्या असल्याचा उल्लेख त्यांनी ट्विटमध्ये केला आहे. कमला हॅरीस या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. त्यांच्या आई  गोपालन हॅरिस यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता, पेशाने त्या डॉक्टर होत्या.  2009 मध्ये त्यांचा मृत्यु झाला. कमला हॅरीस यांचे वडील जमैकन वंशाचे असून ते सध्या स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयात अध्यापनाचे काम करत आहेत. लहान असतानाच हॅरीस यांच्या आई-वडीलांचा काडीमोड झाला होता.

हे वाचा - पहिली लस रशियाचीच; पुतीन यांची घोषणा, मुलीलाही दिली लस

कमला हॅरीस या पहिल्या भारतीय आणि आशियायी वंशाच्या व्यक्ती आहेत ज्यांना अमेरिकेतील उपराष्ट्रपती पदाचे तिकीट मिळाले आहे. तसेच त्या डेमोक्रेट गेराल्डाइन फेरारो आणि रिपब्लिकन सारा पॉलिन यांच्यानंतरच्या एका प्रमुख पार्टीकडुन तिकीट मिळालेल्या तिसऱ्या आफ्रिकी- अमेरिकन महिला आहेत. कमला हॅरीस यांचं बालपण ऑकलंडमध्ये गेलं. तसेच त्यांनी हॅावर्ड विद्यापिठातून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापिठातून वकिलीची अभ्यास केला. नंतर हॅरीस यांनी 2013 मध्ये सॅन फ्रांन्सीसकोमध्ये जिल्हा वकील म्हणून काम सूरु केलं होतं.  नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करुन 2017 मध्ये  कॅलिफोर्निया मधून सिनेटर म्हणून निवडून गेल्या.  तसेच त्यांनी होमलॅंड सेक्युरिटी, गवर्नमेंट अफेयर्स कमेटी, इंटेलिजेंस सेलेक्ट कमेटी, ज्यूडिशियरी कमेटी आणि बजेट कमेटी या महत्वाच्या  काम ठिकाणी केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who is Indian origin kamala harris few facts about joe biden democratic vice presidential candidate