Tahawwur Rana : कॅनडामधील बिझनेसमन कसा झाला अतिरेकी? ऑफिसमधूनच केला होता २६/११ चा प्लॅन

तहव्वूर राणा हा कुख्यात दहशतवादी डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र आहे.
Tahawwur Rana
Tahawwur RanaEsakal

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याने केवळ देशालाच नाही, तर जगाला हादरवले होते. या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीशी राणाचे लागेबंधे होते, असं अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलं होतं. नेमका कोण आहे हा राणा, आणि या हल्ल्यासाठी त्याने कशी मदत केली? जाणून घेऊया.

कोण आहे राणा?

तहव्वूर राणा हा कुख्यात दहशतवादी डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र आहे. त्याचा जन्म पाकिस्तानात झाला होता. हेडली आणि राणा पाकिस्तानातील हसन अब्दुल कॅडेट स्कूलमध्ये एकत्र होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राणाने पाकिस्तानी आर्मीमध्ये डॉक्टर म्हणून काम केले.

Tahawwur Rana
26/11 Attack: भारताला मोठं यश! 26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्यास अमेरिकी कोर्टाची मंजुरी

त्यानंतर तहव्वूर राणा कॅनडाला शिफ्ट झाला. काही वर्षं कॅनडामध्ये राहिल्यानंतर त्याने तिथले नागरिकत्व मिळवले. यानंतर अमेरिकेत त्याने फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन नावाची एक कन्सल्टन्सी फर्म सुरू केली. शिकागो शहरात याचं मुख्य ऑफिस होतं. याच कंपनीची एक शाखा पुढे मुंबईमध्येही सुरू करण्यात आली.

हेडलीची केली मदत

यादरम्यान डेव्हिड हेडली हा लष्कर-ए-तोयबाचा या दहशतवादी संघटनेचा सदस्य झाला होता, आणि कित्येक विघातक कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्यापूर्वी रेकी करण्यासाठी त्याने राणाच्या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसची मदत घेतली होती.

अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, राणाला हेडलीच्या कामाची माहिती होती. तरीही त्याने हेडलीला पाठीशी घातले, आणि दहशतवादी कारवायांसाठी त्याची मदत केली. या हल्ल्याचे नियोजन, टार्गेट असलेल्या जागा, हेडलीच्या बैठका यांबाबतही राणाला माहिती असल्याचा दावा अमेरिकेच्या वकिलांनी केला आहे.

Tahawwur Rana
इम्रान खान यांच्या घरात ४० दहशतवादी लपल्याची माहिती, पोलिसांनी घातला वेढा; सरकारचा २४ तासांचा अल्टिमेटम

१६६ जणांचा बळी

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईमध्ये दहा दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. शहरातील विविध जागांवर प्रचंड गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर दहशतवाद्यांनी ताज आणि ओबेरॉय हॉटेलही आपल्या ताब्यात घेतले होते. तीन दिवस या दहशतवाद्यांशी लढा सुरू होता. या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचा बळी गेला होता. यामध्ये विदेशी नागरिकांचाही समावेश होता.

Tahawwur Rana
Prince Harry : भारतीय वंशाच्या व्यक्तीने वाचवले ब्रिटनच्या प्रिन्सचे प्राण; पापाराझी करत होते पाठलाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com