
गूगल डूडलद्वारा आदरांजली दिलेली नजीहा सलीम कोण? जाणून घ्या
आज गूगलच्या (Google) होमपेजवर गूगल डूडल (Google Doodle) द्वारा नजीहा सलीम (Naziha Salim) यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठा सर्च इंजिनने नजीहा सलीम यांना आदरांजली वाहल्याने आज हा चर्चेचा विषय ठरतोय. पण तुम्हाला माहिती आहे का ही नजीहा सलीम कोण?
हेही वाचा: शिक्षकाने चार महिने सुरू ठेवला शाळेतील नळ, चक्क अडीच लाख बिल आले
नजीहा सलीम या इराकच्या एक उत्तम कलाकार, चित्रकार सोबतच प्राध्यापिका होत्या. आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण इराणी महिलांचं वास्तवादी चित्र मांडलं. सुरूवातीपासूनच नजिहा यांना कलेवर प्रेम होतं. त्यांचे वडील चित्रकार आणि आई निष्णात एम्ब्रॉडरी आर्टिस्ट होती.
हेही वाचा: World Book Day: शेक्सपिअरच्या जन्म अन् मृत्यूमध्ये एका गोष्टीचे साम्य; जाणून घ्या
नजीहा सलीमची कलाकृती शारजाह आर्ट म्युझियम आणि मॉडर्न आर्ट इराकी आर्काइव्हमध्ये आज झळकत आहे. कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतासाठी नजीहा सलीम एक आदर्श आहे.
Web Title: Who Is Naziha Salim Whom Google Doodle Pays Tribute Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..