शिक्षकाने चार महिने सुरू ठेवला शाळेतील नळ, चक्क अडीच लाख बिल आले

या शिक्षकाला वाटले की शाळेच्या स्विमिंग पुलमध्ये सतत ताजे पाणी वाहूत राहल्याने ते कोरोना मुक्त राहील.
a teacher left a water tap on for months
a teacher left a water tap on for monthssakal

कोरोनामुळे आपण स्वत:चे संरक्षण करणे शिकलाय. कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण मास्क, सॅनिटायझर वापरत असतो मात्र जपानमध्ये एका शिक्षकाने कोरोना व्हायरस संसर्ग होऊ नये यासाठी अनेक महिने शाळेतील पाण्याचा नळ चक्क चालू ठेवला.यात धक्कादायक म्हणजे यामुळे जपानी शाळेला 27,000 डॉलर पाण्याचे बिल आले आहेत.

a teacher left a water tap on for months
World Book Day: शेक्सपिअरच्या जन्म अन् मृत्यूमध्ये एका गोष्टीचे साम्य; जाणून घ्या

या शिक्षकाची अद्याप ओळख पटलेली नाही. या शिक्षकाला वाटले की शाळेच्या स्विमिंग पुलमध्ये सतत ताजे पाणी वाहूत राहल्याने ते कोरोना मुक्त राहील. त्यामुळे त्यांनी जूनच्या शेवटीपासून ते सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत नळ चालू ठेवला.

खरतर क्लोरीन आणि फिल्टरिंग मशीन पूलच्या पाण्याची गुणवत्ता राखतात. परंतु सतत येणारे नवीन पाण्याने कोरोना रोखण्यास मदत होईल, असा चुकीचा समज झालाय. मात्र त्यामुळे मोठी किंमत शाळेला मोजावी लागली आहे.

a teacher left a water tap on for months
सर्वांत मोठा युद्धगुन्हा मारिउपोलमध्ये

जुन ते सप्टेंबर महिन्यादरम्यान शाळेतील इतर कर्मचारी सदस्यांनी चालू असलेला टॅप पाहिला असता अधूनमधून तो बंद केला परंतु या शिक्षकाला दिसताच तो पुन्हा नळ सुरु करायचा. यामुळे अंदाजे 4,000 टन जास्तीचे पाणी फक्त दोन महिन्यांत वाया गेले. याप्रकरणी पोलिस तपास करत आहे. मात्र घटनेची सर्वत्र चर्चा सुरु आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com