हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळीच्या वापरासंदर्भात WHO ने व्यक्त केली ही भीती

 WHO, Hydroxychloroquine
WHO, Hydroxychloroquine
Updated on

जिनेव्हा : कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकलेल्या जगाला  हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाने थोडा फार दिलासा दिलाय. कोरोनाग्रस्त रुग्णावरील उपचारादरम्यान हे औषध उपयुक्त ठरताना दिसत आहे. भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या  या औषधाची जगभरातून मागणी वाढली आहे. जगभरातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतातून या औषधाची 70 टक्के इतकी निर्यात केली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनाची कोणतीही लक्षणं नसताना देखील खबरदारी म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्या घेत आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने या गोळ्यांच्या वापरासंदर्भात भीती व्यक्त केलीय. या गोळ्यांचा वापर करण्यापूर्वी क्लिनिकल ट्रायलची आवश्यकता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.  

भारतासह अमेरिका आणि अन्य बऱ्याच राष्ट्रांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णावरील उपचारादरम्यान हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्यांचा वापर करण्यात येत आहे. मलेरियावरील हे औषध कोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी फायदेशीर असल्याचा दावाही करण्यात आला आहे. हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि क्लोरोक्विन या गोळ्यांच्या वापरासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन योजना विभागाचे संचालक डॉ मायकल रयान म्हणाले की, दोन्ही औषधे अनेक आजारावर उपाय म्हणून वापरण्यात येतात. 

कोरोना विषाणूवर हे औषध जालीम उपाय आहे असे म्हणता येणार नाही. यासंदर्भात आजही संशय कायम असून अनेक अधिकाऱ्यांनी हे औषध क्लिनिकल ट्रालयसाठी मर्यादित ठेवण्यास सांगितल्याचे त्यांनी म्हटले आहे. या औषधाच्या प्रयोगाने काही साइड इफेक्टसची भीती व्यक्त करण्यात आली आहे, यावरहही त्यांनी जोर दिला. सध्याच्या घडीला या औषधाने काही परिणाम जाणवला नाही तर भविष्यात त्याचा धोका संभवू शकतो, असे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे.  
जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार या औषधाबाबत इशारा देऊनही अनेक देशात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाचा वापर केला जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नसताना ते या गोळ्या घेत आहेत. खुद्द त्यांनीच एका पत्रकारपरिषदेत यासंदर्भात माहिती दिली होती. मात्र जागतिक आरोग्य संघटनेकडून पुन्हा एकदा या औषधासंदर्भातील वापरासंदर्भात इशारा देण्यात आला आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com