US: ख्रिसमस परेडमधील लोकांना कारने चिरडले; 5 ठार, 40 जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Waukesha
US: ख्रिसमस परेडमधील लोकांना कारने चिरडले; 5 ठार, 40 जखमी

US: ख्रिसमस परेडमधील लोकांना कारने चिरडले; 5 ठार, 40 जखमी

अमेरिकेतील मिलवॉकमध्ये (Milwaukee) आज एक मोठी घटना घडली असून, मिलवॉक शहराच्या पश्चिमेला असणाऱ्या वौकेशा (Waukesha) शहरामध्ये ख्रिसमस परेडमध्ये (Christmas parade) कार घुसल्याने मोठा अपघात झाला आहे. यावेळी अनेकजण जखमी झाले असून, काही जणांचा मृत्यू झाल्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. समोर आलेल्या एका व्हीडिओ फुटेजमध्ये ख्रिसमस परेडमध्ये अचानक एक लाल रंगाची स्पोर्ट्स कार घुसल्याने अनेकजण चिरडले गेल्याचे दिसते आहे. या घटनेची चौकशी सुरू असून हा अपघात आहे की अतिरेकी हल्ला याची चौकशी पोलीस करत आहेत.

पोलीस प्रमुख डॅन थॉम्पसन यांनी सांगितले की, या घटनेत काही लहान मुलांसह 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच काही लोकांचा मृत्यू देखील झाला आहे मात्र, कुटुंबातील सदस्यांना सांगितले जात नाही तोपर्यंत कोणतीही माहिती सार्वजनिक केली जाणार नाही असं सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा: मोहिमांतील शांतिसैनिकांसमोरील धोक्यांमध्ये वाढ

हेही वाचा: चीनमध्ये प्रसिध्द लोक का होतात बेपत्ता? काय आहे यामागचं गुढ?

प्राथमिक तपासामधून समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर संशयित परेडमध्ये लोकांमधून मार्ग काढत धावत असल्याचं दिसतंय, तर दुसर्‍या दृश्यातून तो पळून गेल्याचं दिसून आलं. त्यामुळे प्राथमिक माहितीनुसार ही घटना दहशतवादी कृत्य असल्याचे दिसत नाही, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेच 5 ठार आणि 40 जखमी असल्याचे टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तामधून समोर आले आहे.

स्थानिक रहिवासी असलेल्या अँजेलिटो टेनोरिओ यांनी मिलवॉकी जर्नल सेंटिनेल वृत्तपत्राला सांगितले की, ही घटना घडली तेव्हा त्यांनी नुकतेच परेडमध्ये मार्चिंग पूर्ण केले होते. "आम्ही एक SUV पाहिली...काही कळते न कळते तेवढ्यात आम्हाला एक मोठा आवाज ऐकू आला, आणि वाहनाने ज्या लोकांना धडक दिली त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला."

loading image
go to top