फ्रान्स : दहशतवादी हल्ल्यात तिघांचा मृत्यू; हल्लेखोराने दिले 'अल्ला हो अकबर'चे नारे!

वृत्तसंस्था
Thursday, 29 October 2020

मोहम्मद पैगंबरांच्या कार्टूनवरून सध्या फ्रान्समध्ये वाद सुरू झाले असून त्यातूनच हा चाकूहल्ला करण्यात आला. ज्या हल्लेखोराने हा हल्ला केला त्याने 'अल्ला हो अकबर'चा नारा दिला होता.

पॅरिस : फ्रान्समधील नीस शहरातील चर्चमध्ये गुरुवारी (ता.२९) एका हल्लेखोराने चाकू हल्ला करत तिघांना ठार केले. या क्रूर घटनेमध्ये एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी काही फ्रान्स नागरिक जखमी झाले आहेत. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून नीस शहराचे महापौर क्रिश्चियन एस्ट्रोसी यांनी दहशतवादी हल्ला असं या हल्ल्याचं वर्णन केलं आहे. 

चिडलेल्या युट्यूबरने अडीच कोटींची मर्सिडीज दिली पेटवून; VIDEO VIRAL​

मोहम्मद पैगंबरांच्या कार्टूनवरून सध्या फ्रान्समध्ये वाद सुरू झाले असून त्यातूनच हा चाकूहल्ला करण्यात आला. ज्या हल्लेखोराने हा हल्ला केला त्याने 'अल्ला हो अकबर'चा नारा दिला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हल्लेखोराला घेरले आणि त्याच्यावर गोळी झाडली. जखमी अवस्थेतील हल्लेखोराला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नोट्रे डेम चर्चमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात एका महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे फ्रान्सच्या एका मंत्र्यानेही स्पष्ट केले आहे. तर राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या घटनेला इस्लामी आतंकवादी हल्ला असे म्हटले आहे. 

सौदीचा पाकला दणका तर भारताला दिवाळी भेट; नकाशा प्रकरणात घेतला 'यू टर्न'​

४७ वर्षीय इतिहास शिक्षक सॅम्युएल पैटी यांनी विद्यार्थ्यांना मोहम्मद पैगंबर यांचे काही कार्टून अभिव्यक्ती स्वतंत्रता या विषयावर चर्चा करताना दाखविली होती. यानंतर काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर फ्रान्समध्ये खळबळ उडाली आहे. 

चार्ली हेब्दो व्यंगपत्रिका कार्यालयावर जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या नरसंहाराबाबत सद्या सुनावणी सुरू आहे. या व्यंगपत्रिकेने मोहम्मद पैगंबरांचे कॅरिकेचर प्रकाशित केले होते. यामुळे इस्लामी धर्मीयांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. सप्टेंबर महिन्यात ही कॅरिकेचर पुन्हा प्रकाशित करण्यात आली. तेव्हा युवा पाकिस्तानी व्यक्तीने पत्रिका कार्यालयाबाहेर दोन व्यक्तींची हत्या केली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Beheaded As 3 Killed At France Church