Guinness World Record : नाद करा, पण आमचा कुठं? 'या' महिलेनं सर्वात वेगानं चहा बनवण्याचा केला विश्वविक्रम!

चहा बनवताना महिलेनं Vanilla आणि स्ट्रॉबेरी या फ्लेवर्सचा देखील वापर केलाय.
Guinness World Record Ingar Valentyn
Guinness World Record Ingar Valentynesakal
Summary

चहा बनवताना महिलेनं Vanilla आणि स्ट्रॉबेरी या फ्लेवर्सचा देखील वापर केलाय.

Guinness World Record Ingar Valentyn : दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) एका महिलेनं एक अनोखा विक्रम करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) आपलं नाव नोंदवलंय. या महिलेनं वेगानं चहा बनवण्याचा विक्रम केलाय. त्यानंतर तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आलंय.

या महिलेचा चहा (Tea) बनवण्याचा वेग इतका होता की, तिनं 1 तासात 249 कप चहा बनवला. सर्वात वेगवान चहा बनवण्याचा विक्रम करणाऱ्या या महिलेचं नाव इंगार व्हॅलेंटीन (Ingar Valentyn) आहे. इंगार व्हॅलेंटीननं रुईबोस (Rooibos) चहाचा वापर करून चहा बनवण्याचा हा विक्रम केलाय. हा लाल हर्बल चहा आहे. हे दक्षिण आफ्रिकेत आढळणाऱ्या Aspalathus linearis वनस्पतीच्या पानांपासून बनवला जातो.

Guinness World Record Ingar Valentyn
Forbes 2022 List : गौतम अदानी बनले भारतातील सर्वात 'श्रीमंत' व्यक्ती; मुकेश अंबानींना टाकलं मागं!

चहा बनवताना महिलेनं Original, Vanilla आणि स्ट्रॉबेरी (Strawberry) या तीन फ्लेवर्सचा वापर केलाय. इंगार व्हॅलेंटीनला चहा बनवण्याचा विक्रम मोडण्यासाठी 1 तासात 150 पेक्षा जास्त चहा बनवावे लागले, पण या महिलेनं 249 कप चहा बनवून आपलं नाव कोरलंय. इंगारनं प्रत्येक चहाच्या भांड्यात चार-चार चहाच्या पिशव्या मोठ्या वेगानं ठेवल्या, त्यामुळं ती खूप वेगानं चहा बनवू शकली. या महिलेनं बनवलेला चहा प्यायला शालेय विद्यार्थीही उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी चहा प्यायल्यानंतर या महिलेला कप धुण्यासही मदत केली.

Guinness World Record Ingar Valentyn
Guinness World Record Ingar Valentyn
Guinness World Record Ingar Valentyn
Andheri Election : अंधेरीच्या पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट? 'या' उमेदवाराचा उद्धव ठाकरेंच्या सेनेवर गंभीर आरोप

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, महिलेनं हा विक्रम तिच्या छंदासाठी नाही तर येथील पर्यटन आणि रुईबोस चहाला प्रोत्साहन देण्यासाठी केला आहे. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील वुपरथल (Wupperthal) समुदायाचे लोक नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी करत होते. त्यावेळी येथील डोंगराळ जंगलात आग लागली आणि ही आग निवासी भागातही पसरली होती. या आगीत अनेक घरं जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे 200 लोक बेघर झाले होते. यामध्ये इंगार व्हॅलेंटीनचा देखील समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com