प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी बांग्लादेशहून तरुणी चक्क पोहत भारतात आली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woman swims to india from bangladesh to marry boyfriend

प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी बांग्लादेशहून तरुणी चक्क पोहत भारतात आली

प्रेमात माणूस वेडा होतो, असे म्हणतात. प्रेमासाठी माणूस काहीही करू शकतात.या गोष्टीचा प्रत्यय दिलाय एका बांग्लादेशी तरुणीने.तिने जे केले,ते वाचून तु्म्हीही थक्क व्हाल. ही बांग्लादेशी तरुणी आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी बांग्लादेशहून चक्क भारतात पोहत आली. हे प्रकरण जितके धक्कादायक आहे तितकेच ते प्रचंड व्हायरल होत असून सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: युक्रेन रशियावर हल्ला करणार! अमेरिका देणार लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे

22 वर्षीय या तरुणीने भारतात राहणाऱ्या तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली.ज्यासाठी तिने सुंदरबनचे धोकादायक जंगलच नव्हे तर एक नदीही पोहत पार केली. सुंदरबनच्या घनदाट जंगलात रॉयल बंगाल टायगरसारख्या प्राण्यांचा आश्रय आहे.

हेही वाचा: सचिन पायलट-अशोक गेहलोत यांचा वाद चव्हाट्यावर

दोघांची फेसबुकवर भेट झाली

या बांगलादेशी तरुणीचे नाव कृष्णा मंडल असे आहे. भारतात राहणाऱ्या अभिक मंडलसोबत फेसबुकवर मैत्री होती.ते फेसबूकवर बोलायचे आणि नंतर हळूहळू दोघेही प्रेमात पडले. कृष्णाकडे पासपोर्ट नव्हता, त्यामुळे तीने बेकायदेशीरपणे सीमा ओलांडत बांगलादेशातून भारतात येण्यासाठी पोहण्याचा मार्ग निवडला.ती सुमारे 1 तास नदीत पोहत होती.मात्र तीला अवैधरित्या देशात प्रवेश केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी कोलकाता येथील कालीघाट मंदिरात कृष्णाने अभिसोबत लग्न केले.

हेही वाचा: 'आयकर'ची मोठी कारवाई; देशभरातील दारू व्यावसायिकांच्या 400 ठिकाणांवर छापे

याआधीहीएका बांगलादेशी तरुण चॉकलेट खरेदी करण्यासाठी बेकायदेशीरपणे भारतात पोहत आला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलाला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आणि त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

Web Title: Woman Swims To India From Bangladesh To Marry Boyfriend Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top