विश्वास बसत नाही, पण ही महिला चक्क उकळत्या तेलात हात घालून तळतेय पदार्थ

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 28 October 2020

उकळत्या तेलात  हे पदार्थ तळताना त्या तेलातून निघणारी वाफही नकोशी असते. त्यामुळे त्या कढईसमोरही उभं राहणं नकोसं वाटतं. पण विचार करा, जर एखादी व्यक्ती या कढईतील उकळत्या तेलातच हात घालून पदार्थ तळत असेल तर...

मुंबई  : उकळत्या तेलात  हे पदार्थ तळताना त्या तेलातून निघणारी वाफही नकोशी असते. त्यामुळे त्या कढईसमोरही उभं राहणं नकोसं वाटतं. पण विचार करा, जर एखादी व्यक्ती या कढईतील उकळत्या तेलातच हात घालून पदार्थ तळत असेल तर...

यावर कुणाचाच सहज विश्वास बसणार नाहीच. मात्र सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

फर्स्ट व्ही फेस्ट या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडिओमध्ये एक महिला चक्क आपल्या हातानेच गरमागरम तेलात पदार्थ सोडून आपल्या हातानेच तळताना दिसत आहे.

 

 

एका कढईजवळ ही महिला उभी असून कढईतलं तेल उकळत आहे,  ही महिला आपल्या हातातील एका भांड्यातून पदार्थ घेऊन तो या उकळत्या कढईत सोडते.

एरवी आपण हाताने तेलात पदार्थ सोडल्यानंतर तो तळण्यासाठी चिमटा, चमचा किंवा काहीतरी वापरतोच. मात्र ही महिला आपल्या हाताच्या बोटांनी तेलात सोडलेले पदार्थ तळताना दिसत आहे.

आपल्याला व्हिडीओ पाहूनही विश्वास बसत नाही आहे. तर तिथं प्रत्यक्षात उपस्थित असलेल्या लोकांनाही यावर विश्वास बसत नाही. त्यावेळी महिलेनं कढईतील हे तेल आपल्या हातातही घेऊन दाखवल्याचं दिसतं.

या तेलात हात घातल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील हावभावात तसूभरही फरक जाणवत नाही.  शिवाय तिच्या हातांवरही काही भाजल्याच्या खुणा सुध्दा दिसत नाहीत.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. नेटकऱ्यांनी महिलेच्या कलेला भरभरून दाद दिली आहे. हे सर्व पाहून अवाक झालेले नेटकरी, आपण तर असं कधीच पाहिलं नाही, अशा प्रतिक्रिया देत आहेत. तर एका ट्विटर युझरने कदाचित तिच्या हातावरील बॅटरमुळे तिला चटके जाणवत नसावेत, असा अंदाज बांधला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women put their hands in boiling oil and fry