World Population Day 2024 : पहिला जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा झाला? २०३० पर्यंत भारताची लोकसंख्या किती असेल?

World Population Day 2024 : जगातील प्रत्येक व्यक्तीने वाढत्या लोकसंख्येकडे लक्ष दिले पाहिजे आणि लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात आपली भूमिका निभावली पाहिजे
World Population Day 2024
World Population Day 2024 esakal
Updated on

World Population Day 2024 : वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी ११ जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की, जगातील प्रत्येक व्यक्तीने वाढत्या लोकसंख्येकडे लक्ष दिले पाहिजे आणि लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात आपली भूमिका निभावली पाहिजे.

वाढत्या लोकसंख्येने जगातील बऱ्याच देशांसमोर मोठ्या समस्येचे रूप धारण केले आहे. त्याचा सर्वात जास्त तोटा विकसनशील देशांना होत आहे. लोकसंख्या स्फोट ही एक गंभीर चिंता आहे. या दिवशी लोकांना कौटुंबिक नियोजन, लिंग समानता, मानवी हक्क आणि महिला आरोग्य याबद्दल माहिती दिली जाते. (World Population Day History)

पहिला जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा झाला? (First World Population Day)

11 जुलै, 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज बनली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. या स्वारस्यात दिवसेंदिवस वाढ होत राहिल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले.

सन 1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) गव्हर्निंग काऊंन्सिलने 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, सन 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो.

लोकसंख्या देशाची ताकद असते पण...

लोकसंख्या ही त्या-त्या देशाची ताकद असते असं म्हटलं जातं. लोकसंख्येचा आकार किती आहे याचाही एखाद्या देशाच्या विकासावर आणि इतर गोष्टींवर परिणाम होतो. जर एखाद्या देशाची लोकसंख्या जास्त असेल तर त्या देशाचा विकास संथगतीने होतो. (World Population Day)

World Population Day 2024
२०२२ मध्ये जगाची लोकसंख्या ८०० कोटींच्या पार | World Population

अशा देशांसमोर अनेक आव्हाने उभी राहतात. वाढत्या लोकसंख्येला जगवण्यापासून ते नैसर्गिक स्त्रोतांच्या योग्य वापरापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आशिया आणि आफ्रिका या खंडातील देशांच्या विकासाला वाढत्या लोकसंख्येमुळे आळा बसला आहे.

2011 साली जगाची लोकसंख्या सात अब्जपर्यंत पोहोचली. सध्या जगाची लोकसंख्या ही 8.1 अब्ज इतकी असून 2030 मध्ये ती 8.5 अब्ज तर 2050 मध्ये ती 9.7 अब्ज इतकी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक लोकसंख्या 10.9 अब्जचा टप्पा पार करणार आहे. (Population)

World Population Day 2024
Indian Population: लोकसंख्या नियंत्रणावर रामदेवबाबांचा खास सल्ला! "तरच होणार देशाची प्रगती.. "

लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी तयार केलेली काही घोषवाक्ये...

1) कुटुंब असेल लहान तरच होईल मेरा भारत महान

2) करूया लोकसंख्येचे नियंत्रण, अन्यथा ठरेल अधोगतीस निमंत्रण

3) कुटुंब लहान ,सुख महान

4) कुटुंब नियोजनात कसूर,लोकसंख्येचा प्रश्न भेसूर‘

5) करूया कुटुंबाचे नियोजन, आनंदी राहू प्रत्येक जण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.