जगात लग्नात पाळल्या जाणाऱ्या 'या' विचित्र परंपरा तुम्हाला माहिती आहेत का?

world strange and funny wedding tradition
world strange and funny wedding tradition

यंदा कोरोनामुळे लग्नसराईवर मोठा परिणाम झाला आहे. काही प्रथा परंपरांना सोशल डिस्टन्सिंगमुळे तिलांजली देत लग्न सोहळे उरकले जात आहेत. आपल्याला भारतात होणाऱ्या लग्न सोहळ्यातील परंपरा आणि इतर गोष्टी माहिती आहेत. मात्र जगभरात लग्नामध्ये अनोख्या प्रथा बघायला मिळतात. वेगवेगळ्या देशात लग्नावेळी अनेक प्रथा परंपरा दिसून येतात. 

बोर्निया देशात लग्नाच्या दिवशी वधुवरांना कुठेही जाण्यास परवानगी नसते. दिवसभर त्यांना सोबतच रहावं लागतं. भारतातही असं असतं पण यात थोडी तरी सूट असते. बोर्नियात मात्र असं नाही. तिथं ही परंपरा काटेकोरपणे पाळली जाते. वधु किंवा वराला कुठेही जाता येत नाही या परंपरेमागे लोक असं मानतात की यामुळे विवाह बंध घट्ट होतात. 

जर्मनीत लग्नामध्ये नवरा नवरीला चीनी मातीच्या भांडी घासावी लागतात. त्यानंतर ती स्वच्छ करूनही ठेवावी लागतात. हीच स्वच्छ केलेली भांडी लग्नासाठी आलेली पाहुणे मंडळी जमिनीवर फेकतात. भांड्यांमध्ये वाईट आत्मा असतो असं म्हटलं जातं. तो घालवण्यासाठी आधी भांडी साफ करायला लावली जातात आणि त्यांनंतर पुन्हा पाहुण्यांना फेकण्यासाठी देतात. 

जपानध्ये लग्नावेळी नवरी वेगळाच सोहळा साजरा करते. यामध्ये नववधू डोक्यापासून ते पायापर्यंत पांढरे कपडे घालते. तिच्या कपड्यांपासून साज श्रृंगारापर्यंत सगळंच पांढऱ्या रंगाचं असतं याला शिंटो समारंभ असंही म्हटलं जातं. अगदी मेकअपसुद्धा पांढरा असतो. यामागे जपानी लोकांची अशी धारणा आहे की, पांढरा तिच्या पहिल्या अवस्थेचं प्रतिक म्हणून असतो.  

ग्रीकमध्ये लग्नात नवऱ्याची दाढी केली जाते. एवढंच नाही तर मुंडनही करावं लागतं. त्यानंतर नवऱ्याची होणारी सासू त्याला मध आणि बदाम खायला घालते. फ्रान्समध्ये लग्नाच्या आधी स्वागत समारंभाचे काहीवेळा आयोजन केले जाते. त्या रिसेप्शननंतर दाम्पत्याला चॉकलेट आणि शँपेन दिलं जातं. ते देण्याची परंपरा फ्रान्समध्ये आहे. तिथं असं मानलं जातं की लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या आधी त्या दोघांना मजबूत बनवण्यासाठी ही परंपरा साजरी केली जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com