दगड नाही रत्नं आहेत! एका रात्रीत खाणीतील कामगार बनला कोट्यधीश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जून 2020

एखाद्याचं नशीब कधी उघडेल काय सांगता येत नाही. टांझानियातील एका खाणीत काम करणाऱ्या मजुराचंही आयुष्य एका क्षणात बदललं.

एखाद्याचं नशीब कधी उघडेल काय सांगता येत नाही. टांझानियातील एका खाणीत काम करणाऱ्या मजुराचंही आयुष्य एका क्षणात बदललं. रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार टांझानियातील खाणीत काम कऱणाऱ्या कामगाराला आतापर्यंतचे सर्वात मोठी दोन दुर्मीळ अशी रत्नं सापडली. बुधवारी सरकारने त्या व्यक्तीला दोन रत्नांच्या बदल्यात 7.74 बिलियन टांझानिया शिलिंगचा चेक दिला. याची भारतीय रुपयांमध्ये 25 कोटी 36 लाख रुपये इतकी किंमत होते. 

ओसामा बिन लादेन हुतात्मा; इम्रान खान यांचं संसदेत खळबळजनक वक्तव्य

कामगाराला सापडलेली दोन्ही रत्ने जांभळ्या रंगाची आहेत. दुर्मीळ अशी रत्ने Saniniu Laizer नावाच्या व्यक्तीला देशाच्या उत्तरेकडे असलेल्या एका खाणीत सापडली. टांझानियाच्या खाण उद्योग मंत्र्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पहिल्या रत्नाचे वजन 9.27 किलो तर दुसऱ्या रत्नाचे वजन 5.10 किलोग्रॅम इतकं आहे. 

नेहरुंच्या काळातील कार्याचे पंतप्रधान मोदींनी गायले गोडवे, दक्षिण कोरियात दाखवला व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार टांझानाइट रत्ने फक्त पूर्व आफ्रिकेतील राष्ट्रांतील उत्तर भागातील अत्यंत लहान परिसरात सापडतात. याबद्दल खाण उद्योग मंत्रालयाचे सचिव Simon Msanjila यांनी सांगितलं की आजची ही घटना मीरानीमध्ये खाण उद्योगाला सुरुवात झाल्यानंतर इतिहासातील सर्वात मोठी दोन अशी रत्ने पहिल्यांदाच सापडली आहेत. 

कोरोनावरील संभाव्य लसीच्या मानवी चाचणीला ब्रिटनमध्ये सुरवात

टांझानियात अशी रत्ने सापडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर Saniniu यांना चेक देण्याचा कार्यक्रम टीव्हीवरून लाइव्ह टेलिकास्ट करण्यात आला. यावेळी देशाचे राष्ट्रपती John Magufuli यांनी Saniniu यांचे फोनवरून अभिनंदन केले. ही दोन्ही रत्ने टांझानिया बँकेनं खरेदी केली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tanzania mine worker found two rare stones price near 26 crore