esakal | जगावर कोरोनापेक्षा पाण्याचं संकट मोठं; 2025पर्यंत येईल भयंकर परिस्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

Water

सध्याच्या घडीला जगातील ३ पैकी १ व्यक्ती शुद्ध पिण्याच्या पाण्याशिवाय जगत आहे.

जगावर कोरोनापेक्षा पाण्याचं संकट मोठं; 2025पर्यंत येईल भयंकर परिस्थिती

sakal_logo
By
वृत्तसंस्था

World water day 2021 : न्यूयॉर्क : पाण्याचं महत्त अधोरेखित करण्यासाठी आणि जगाला भेडसावणाऱ्या पाण्याच्या संकटाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने २२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. २०३०पर्यंत 'सर्वांसाठी पाणी' हे लक्ष्य साध्य करणं हे संयुक्त राष्ट्रसंघानं एक आव्हान म्हणून स्वीकारलं आहे.

जागतिक जल दिनाचा इतिहास
जागतिक जल दिन साजरा करण्याचा ठराव २२ डिसेंबर १९९२ रोजी युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने मंजूर केला. आणि त्यानंतर २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले. १९९३ पासून हा दिवस जगभरात साजरा करण्यास सुरवात झाली.

अभिमानास्पद!  कॅनडामध्ये उभारला महात्मा गांधींचा बर्फाचा पुतळा​

जागतिक जल दिन २०२१ची थीम
जागतिक जलदिनानिमित्त 'पाण्याचं मूल्य' (Valuing Water) ही यंदाची थीम आहे. दैनंदिन जीवनातील पाण्याचं महत्त्व अधोरेखित करण्याकडे लक्ष्य वेधण्यात येणार आहे. पाण्याचं मूल्य त्याच्या किंमतीपेक्षा खूपच जास्त आहे. आपले अन्न, आरोग्य, संस्कृती, अर्थशास्त्र, शिक्षण आणि निसर्गाच्या अखंडतेत पाण्याचं जटिल मूल्य आहे. त्यामुळे आपण ज्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही, अशा घटकाचा गैरवापर करण्याची जोखीम घेत आहोत, असं यूएननं म्हटलं आहे. 

टॅक्सी चालवणाऱ्या भारतीय महिलेचा असामान्य प्रवास; विदेशात झाली पोलीस​

जगातील ३ पैकी १ व्यक्ती जगते शुद्ध पिण्याच्या पाण्याशिवाय
संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरस या जागतिक महामारीचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा जागतिक जलदिन साजरा करण्यात येत आहे. जलसंकटाला कसे सामोरे जावे यासाठी विविध देशांनी धोरणात्मक निर्देश सुचविण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र जल विकास अहवाल जाहीर करणार आहे. सध्याच्या घडीला जगातील ३ पैकी १ व्यक्ती शुद्ध पिण्याच्या पाण्याशिवाय जगत आहे. तर जगातील निम्मी लोकसंख्येवर २०२५ पर्यंत पाण्याची कमतरता असलेल्या भागात राहण्याची नामुष्की ओढवेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे पाणी या मौल्यवान संसाधनाचा वापरण्यासाठी सर्वांनी पुढे या असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघानं केलं आहे. 

जपान भूकंपाने हादरलं, त्सुनामीचा इशारा; पाहा VIDEO​

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान 'जलशक्ती अभियान : कॅच द रेन' मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच जलशक्ती मंत्रालय, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यात 'केन-बेटवा लिंक' प्रकल्पासाठी करार करण्यात येणार आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली. केन-बेटवा हा भारतातील पहिला नदी जोड प्रकल्प आहे, जो पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या भागात राबविण्यात येत असून यामुळे अनेक दिवसांपासूनचे पाण्याशी संबंधित प्रलंबित प्रश्न सुटणार आहेत, असं पंतप्रधान कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.

- जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image