esakal | काय आहे जगभरातील लशींची अवस्था
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine.

सध्या जगभरातील संशोधक 38 लसींची क्लिनिकल तर जवळपास 93 लशींची प्रिक्लिनिकल चाचणी घेत आहेत.

काय आहे जगभरातील लशींची अवस्था

sakal_logo
By
विनायक होगाडे

कधी एकदा चेहऱ्यावरचा मास्क निघून जातोय, असं झालंय ना...? किती दिवस आपल्याच जवळच्या लोकांपासून सुरक्षित अंतर पाळायचं, असही वाटत असेलच! एकदाची लस येऊदे आणि सारं काही पूर्वीसारखं होऊदे...! होईल... नक्की होईल... कारण... लवकरच लस निर्माण होईल अशी आशा आशा आहे.
पण ही लस निर्मितीची प्रक्रिया कशी होते? याचे टप्पे नेमके काय आहेत? आणि भारतात सध्या किती लसींवर काम सुरू असून त्या कोणत्या टप्प्यावर आहेत...? हेच आपण जाणून घेणार आहोत...

एखादी लस प्रयोगशाळेत तयार होऊन तिच्यावर काही वर्षांचं संशोधन आणि अनेक चाचण्या यांचे टप्पे पार करत ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला काही वर्षे लागू शकतात. सध्या जगभरातील संशोधक 38 लसींची क्लिनिकल तर जवळपास 93 लशींची प्रिक्लिनिकल चाचणी घेत आहेत.
हे क्लिनिकल-प्रिक्लिनिकल आणि फेज 1, फेज 2, फेज 3 काय आहे... हे आधी नीटपणे समजून घेऊयात...

हा व्हिडीओ जरुर पहा...

प्रिक्लिनिकल टेस्टिंग (Preclinical Testing)- 
या फेजमध्ये शास्त्रज्ञ पेशींवर नव्या लसीची चाचणी करतात. आणि त्यानंतर मग ती लस प्राण्यांना देतात. उंदीर अथवा माकड हे प्राणी या चाचणीसाठी निवडले जातात ज्यांच्यात प्रतिकारशक्ती वाढतेय का याची तपासणी केली जाते.
मगाशीच म्हटल्याप्रमाणे जगभरातील 93 लसी या सध्या या अवस्थेत आहेत.

फेज 1 सेफ्टी ट्रायल (Phase 1 Safty Trial)-
 या फेजमध्ये शास्त्रज्ञ अगदी काही मोजक्या लोकांना लस देतात, ज्यातून ही लस सुरक्षित आहे की नाही याची तपासणी केली जाते. आणि त्याचबरोबर लसीमुळे प्रतिकार शक्ती वाढते की नाही याचीही खात्री केली जाते. सध्या जगभरातील 25 लस या अवस्थेत आहेत.

फेज 2 एक्सपांड ट्रायल्स (Phase 2 Expand Trial)- 
या फेजमध्ये शास्त्रज्ञ शेकडों लोकांना लस देतात. मात्र लस दिलेल्या या लोकांची विभागणी काही गटात करतात. जसे की लहान मुले, वयस्कर, महिला वगैरे वगैरे... या गटांवर लस कशाप्रकारे काम करते हे पाहण्यासाठी हे गट केले जातात. आणि मग लसीची सुरक्षितता आणि ती रोगाविरोधात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी किती योग्य आहे हे तपासलं जातं. सध्या जगभरातील 14 लस या फेज 2 मध्ये आहेत.

हेही वाचा - पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी ट्रेंड होतोय 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस'

फेज 3 एफिसीऐंशी ट्रायल (Phase 3 Effeciency Trial) -
या फेजमध्ये हजारो लोकांना लस दिली जाते. आणि या एकूण लोकांपैकी किती लोकांना लस देऊनही रोगाचा प्रादुर्भाव झाला हे तपासलं जातं. यावरून लस किती प्रभावी आहे हेही समजून येतं. सध्या जगातील 9 लस या फेज 3 मध्ये आहेत.

अरली ऑर लिमिटेड अप्रुव्हल (Early & Limited Approval)-
या अवस्थेतही काही लसी आहेत. चीन आणि रशियाने फेज 3 मधील लसीच्या परिणामांना न तपासताच आपल्या लसींना मान्यता दिली आहे. खरं तर तज्ज्ञांचं म्हणणं आहे की घाई-गडबडीत केलेली प्रक्रिया ही अत्यंत धोकादायक असू शकते. सध्या निष्कर्षांचा विचार न करता लगेचच मान्यता दिलेल्या एकूण 3 लसी सध्या जगात आहेत.

प्रत्येक देशातील नियंत्रक हे चाचण्यांचे निष्कर्ष लक्षात घेऊन ठरवतात की लसीला मान्यता द्यायची की नाही... एखाद्या महामारीच्या काळात आणीबाणीच्या परिस्थितीत निष्कर्ष न तपासताच लसीला मान्यता दिली जाऊ शकते. अशी परवानगी मिळाल्यानंतर मग लस दिलेल्या लोकांचा अभ्यास करून ती लस किती सुरक्षित आणि प्रभावी आहे हे ठरवलं जातं.

हेही वाचा - मागील 24 तासांत देशात कोरोनाचा कहर; उच्चांकी रुग्णवाढ​


कम्बाईन्ड फेजेस (Combined Phases) -
 कम्बाईन्ड फेजेस हा एक टप्पा आहे. लसनिर्मितिच्या कामाला गती यावी यासाठी लसनिर्मितीचे काही टप्पे हे एकत्रच पार पाडले जातात. उदा. करोनावरील काही लसी या फेज 1 आणि 2 मध्ये एकाच वेळेला आहेत. म्हणजे, त्या पहिल्याच वेळेला शेकडो लोकांना दिल्या गेलेल्या आहेत. ज्या लसी या फेज 3 मध्ये आहेत. त्यांच्या परिणामकारकतेचा विचार करून, निष्कर्ष तपासून त्या लसींना मान्यता मिळेल.

भारतात काय परिस्थिती?

भारताचा विचार करायचा झाल्यास भारतात सध्या तीन लस या आघाडीवर आहेत. कालच आयसीएमआर (ICMR) म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार कॅडीला आणि भारत बायोटेक यांनी पहिल्या टप्प्यातील चाचण्या या पार केलेल्या आहेत. ऑक्सफर्ड लसीची चाचणी सिरम इन्स्टिट्यूट भारतात घेत आहे. सिरमने फेज 2 मधील बी-3 चाचणी ही पूर्ण केलेली असून तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असल्याची माहिती आय सी एम आर ने दिली आहे. 

लवकरच लस येईल... आणि मास्कशिवाय छातीभरून मोकळा श्वास घ्यायला मिळेल... आणि कसल्याही सुरक्षित अंतराविना आपल्या लोकांना आपुलकीच्या मिठीने कडकडून भेटता येईल, अशी आशा करूयात... तोवर मास्क घाला... आणि हात स्वच्छ ठेवा... इतकंच...