अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांचा दौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

modi and xi jinping

अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांचा दौरा

बीजिंग : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी प्रथमच तिबेटचा दौरा केला. यावेळी त्यांनी अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवरील न्यींगची गावाला भेट दिली होती, असे चिनी माध्यमांनी आज जाहीर केले. जिनपिंग हे बुधवारी (ता. २१) न्यींगची गावात आले होते आणि स्थानिकांनी त्यांचे स्वागत केले, असे वृत्त माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. भारत-चीन सीमेवरील या गावाला भेट देणारे ते पहिलेच चिनी अध्यक्ष ठरले आहेत. या भेटीबद्दल अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती.

हेही वाचा: भूस्खलनाची शक्यता असेल तिथून लोकांना आधीच स्थलांतरित करा!

या दौऱ्यात जिनपिंग यांनी न्यांग नदीवरील पुलाची पाहणी केली. ब्रह्मपुत्रेच्या पात्रातील पर्यावरण जतनाबाबतचाही त्यांनी आढावा घेतला. या नदीवर एक प्रचंड धरण बांधण्याची चीन सरकारी योजना असून १४ व्या पंचवार्षिक योजनेत त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या या प्रकल्पाबाबत भारत आणि बांगलादेशने चिंता व्यक्त केली आहे. अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग असल्याचा दावा असून भारताने तो स्पष्टपणे आणि वारंवार फेटाळला आहे. दोन्ही देशांमधील सीमावादावरून सध्या तणाव असतानाच जिनपिंग यांनी न्यींगची गावाला भे दिली आहे.

हेही वाचा: केंद्राने पाकिस्तानला लस दिल्याने देशात अनेकांचा मृत्यू : नाना पटोले

चिनी नेत्यांनी तिबेटला वारंवार भेटी दिल्या आहेत. मात्र, सीमेला लागूनच असलेल्या गावाला भेट देणारे ते पहिलेच सर्वोच्च नेते ठरले आहेत. ‘तिबेटमधील नागरिकांचे भविष्यातील आयुष्य आनंदाचे आहे, यावर माझा पूर्ण विश्‍वास आहे,’ असे जिनपिंग यांनी येथील लोकांना सांगितल्याचे माध्यमांनी सांगितले.

Web Title: Xi Jinping Visit To Arunachal Pradesh Border

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..