केंद्राने पाकिस्तानला लस दिल्याने देशात अनेकांचा मृत्यू : नाना पटोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्राने पाकिस्तानला लस दिल्याने देशात अनेकांचा मृत्यू : नाना पटोले

केंद्राने पाकिस्तानला लस दिल्याने देशात अनेकांचा मृत्यू : नाना पटोले

पुणे : ''कोरोनाने सर्वचजण संकटात सापडलेले असताना देशातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे सोडून केंद्र सरकारने पाकिस्तानला लस दिली, त्यामुळे दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला. याला केंद्र सरकार जबाबदार'', असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसिटिकल सायन्स आणि इंदुताई कॉलेज ऑफ फिजीओथेरपी या दोन नवीन महाविद्यालयाचे उद्घाटन पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि उपाध्यक्ष रोहित टिळक यांनीही संस्थेच्या वाटचालींबद्दल बोलताना आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेशउपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, डॉ. प्रणिती टिळक, अभय छाजेड, दत्ता बहिरट, डॉ. गीताली टिळक, अविनाश बागवे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडपरिसरात मुसळधार पाऊस; पवना नदीच्या पातळीत वाढ

पटोले म्हणाले, ''कोरोनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असून देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या सगळ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. कोरोना हा मानवनिर्मित असून हे अमेरिकेसारखा देशही सांगत आहे. चीनच्या वुहानमधून कोरोनाची सुरवात झाली. आजही लसीकरण झाल्यावरही कोरोना होतो. पण, जीव वाचतो आणि त्रास होत नाही. त्यामुळे देशातील नागरिकांचे लसीकरण करण्यांसाठी १३० कोटी लोकांना २६० ते ३०० कोटी लसीच्या डोसची गरज आहे. अशावेळी पंतप्रधानांनी दुश्मन देश पाकिस्तानसह इतर देशांना लस दिली. तीच लस आपल्या देशात दिली असती तर देशातील अनेकांचे जीव वाचले असते. गंगेत मृतदेह दिसले नसते''

तसेच, ''केंद्र सरकारने कोणालाही सोडले नाही, ब्लॅकमेलिंग करून सरकारे पाडली. पत्रकारांसह अनेक महत्वाच्या व्यक्तीचे फोन टॅपिंग केलेय. त्यामुळे लोकशाही आहे की नाही हा प्रश्न लोकांना पडला आहे. टिळकांनी ब्रिटिश सरकारला डोकं ठिकाणावर आहे का? असं विचारलं होतं, तसेच आता केंद्रामधील मोदी सरकारचंही डोकं ठिकाणांवर आहे का नाही हे विचारण्याची वेळ आली'' असल्याचे पटोले यांनी म्हणत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

हेही वाचा: पुण्यात झाड कोसळून रिक्षाचालक गंभीर जखमी

स्थानिक स्वराज संस्था स्वबळावरच लढणार

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचे निश्चित झाल्याचेही पटोले यांनी म्हटले. पुणे महापालिकेत भाजपने भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत लोक भाजपला नाकारून काँग्रेसचा स्वीकार करतील, असे पटोलेंनी स्पष्ट केले.

Web Title: Many Died In The India Since The Center Govt Gives Vaccine To Pakistan Said Nana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaNana Patole