आयुष्य 11 महिने 'लॉकडाऊन' झालं; भाऊला कोरोनाची लाट आल्याचं माहितीच नाही

corona britain joseph flavil
corona britain joseph flavil

लंडन - जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरुच आहे. कोट्यवधी लोक गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तसंच लोकांनी प्राणही गमावले आहेत. कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन कऱण्यात आले होते. अद्याप काही देशांमध्ये लॉकडाऊन आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये एक असा तरुण आहे ज्याला कोरोनाचं संकट इतकं मोठं झाल्याची पुसटशी कल्पनाही नाही. 11 महिने कोमात राहिलेल्या तरुणाला या काळात कोरोनाचा कहर आणि त्यामुळे झालेले बदल याबद्दल काहीच माहिती नाही.

ब्रिटनमधील 19 वर्षीय विद्यार्थी जोसेफ फ्लाविल याचा गेल्या वर्षी 1 मार्चला अपघात झाला होता. एका वेगवान कारने त्याला जोराची धडक दिली होती. त्यानंतर जोसेफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जोसेफची तब्येत वेगानं खालावत गेली आणि तो कोमात गेला. त्यावेळी कोरोनाचा संसर्गा फारसा नव्हता. 

जोसेफ जवळपास 11 महिन्यांनी कोमातून बाहेर आला. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे ब्रिटनसह जगात काय घडलं? याची त्याला जरासुद्धा कल्पना नाही. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळं परिस्थिती बिकट आहे. तर दुसरीकडे जोसेफ कोमातून बाहेर आल्यानं त्याचे कुटुंबिय आनंदी आहे. आता कुटुंबासमोर प्रश्न आहे की, जोसेफला कोरोनाच्या काळाबद्दल कसं सांगायचं.

जोसेफ कोमातून बाहेर आल्यानंतर हळू हळू घरच्या लोकांना ओळखायला लागला आहे. तसंच त्याच्या प्रकृतीतसुद्धा सुधारणा होत आहे. जोसेफच्या कुटुंबियांनी म्हटलं की, देशात लॉकडाऊनमुले जोसेफ त्याच्या आईला भेटू शकत नाही. कुटुंबाचे म्हणणे आहे की, त्यांना काळजी आहे की त्याला कोरोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीची माहिती कशी सांगायची. दरम्यान, त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com