यूट्यूब स्टार बनली ठग! फॉलोअर्सला लावला 437 कोटी रुपयांचा चुना; जाणून घ्या प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

natthamon khongchak

यूट्यूब स्टार बनली ठग! फॉलोअर्सला लावला 437 कोटी रुपयांचा चुना; जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली - थायलंडच्या लोकप्रिय यूट्यूबरने तिच्या हजारो फॉलोअर्सना फॉरेक्स ट्रेडिंग स्कॅमद्वारे $55 दशलक्ष (अंदाजे 437.68 कोटी रुपये) चा चुना लावल्याचे आरोप करण्यात आले आहे. गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आश्वासन देऊन आरोपींने ही फसवणूक केली. (Youtube star natthamon khongchak news in Marathi)

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

नट्टामोन खोंगचक, जिला नुट्टी म्हणून ओळखले जाते, तिचे YouTube चॅनेलचे 847,000 हून सब्सक्राईबर्स आहेत. तसचे तिने Instagram खात्यावर विदेशी मुद्रा व्यापार्‍यांसाठी खाजगी अभ्यासक्रमांची जाहिरात देखील केली. नुट्टीच्या जाळ्यात अडकून 6,000 हून अधिक लोकांनी गुंतवणुकीसाठी पैसे दिले.

हेही वाचा: मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

वकिलाच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, नुट्टविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यास वकिलाने डझनभर लोकांना मदत केली आङे. आपल्या फॉलोवर्सला त्यांच्या गुंतवणुकीवर 35% पर्यंत परतावा देण्याचे आश्वासन नुट्टीने फसवले.

ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, मे मध्ये केलेल्या आपल्या शेवटच्या Instagram पोस्टमध्ये, नुट्टी म्हणाली होती की, तिच्याकडे गुंतवणूकदारांचे २७.५ मिलियन डॉलर देणे आहे. तसेच तिने दावा केला होता की, तिच्या ब्रोकरने मार्चपासून तिचे ट्रेडींग खाते आणि फंड ब्लॉक केला आहे. मात्र ती गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

हेही वाचा: धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

दरम्यान पोलिसांनी म्हटलं की, नुट्टीने मंगळवारी इन्स्टाग्राम अकाउंटवर पाठवलेल्या डायरेक्ट मेसेजला प्रतिसाद दिला नाही. सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे पोलीस अधिकारी वट्टाना केतुम्पाई यांच्या म्हणण्यानुसार, थायलंड पोलिसांनी गेल्या आठवड्यात फसवणूक केल्याप्रकरणी नुट्टीविरोधात अटक वॉरंट जारी केले.

Web Title: Youtube Star Natthamon Khongchak Allegedly Cheats Her Followers 55 Million In Forex Scam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..