"पैगंबरांवर टीका करणाऱ्या भारतीयांना मुस्लीम देशांनी तुरुंगात टाकावे''

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 23 October 2020

भारतात द्वेष पसरवण्याच्या गुन्ह्याखाली फरार घोषित करण्यात आलेला कथित इस्लामिक धर्मगुरु जाकिर नाईनने पुन्हा एकदा द्वेषपूर्ण वक्तव्य केलं आहे.

क्वालालंपूर- भारतात द्वेष पसरवण्याच्या गुन्ह्याखाली फरार घोषित करण्यात आलेला कथित इस्लामिक धर्मगुरु जाकिर नाईनने पुन्हा एकदा द्वेषपूर्ण वक्तव्य केलं आहे. मोहम्मद पैगंबर यांच्यावर टीका करणाऱ्या गैर-मुस्लिम भारतीयांना मुस्लिम देशांनी तुरुंगात टाकावे, असं आवाहन नाईकने केले आहे. पैंगबरांवर टीका करणारे बरेचशे लोक भाजपशी जोडले गेलेले आहेत, असंही तो म्हणाला आहे.  

जाकिर नाईकने सौदी अरेबिया, इंडोनेशियासह इतर मुस्लिम राष्ट्रांना आवाहन केले की, पैगंबरांवर टीका करणाऱ्या गैर-मुस्लीम भारतीयांचा एक डेटाबेस तयार केला जावा. ते इस्लामी देशांची यात्रा करायला येतील, तेव्हा त्यांना अटक करण्यात यावी. तसेच गैर-मुस्लीम भारतीयांच्या सर्व नकारात्मक वक्तव्यांची आणि शिव्यांची एक माहिती कॉम्युटरमध्ये सेव केली जावी.

Amazonचा संसदीय समितीसमोर हजर होण्यास नकार

पुढील वेळी जेव्हा हे लोक इस्लामी देशात येतील, तेव्हा त्यांची चौकशी व्हावी. त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर टीका केल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तुरुंगात टाकावे. सर्व इस्लामी देशांनी आपल्याकडे अशाप्रकारचा डेटाबेस असल्याचे सार्वजनिकरित्या जाहीर करावे, मात्र अशा व्यक्तींची माहिती जाहीर करु नये. इस्लामी राष्ट्रात असे लोक आल्यास त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, असं जाकिर नाईक म्हणाला आहे. 

मलेशियातील लोकांशी बोलताना नाईकने म्हटलं की, अशा लोकांवर खटला चालवून त्यांना तुरुंगात टाकावे. पैगंबर यांच्यावर टीका करणाऱ्यांपैकी अधिकतर लोक भारतीय जनता पक्षाचे आहेत. असे लोक इस्लाम आणि मुस्लिमांविरोधात विष पसरवत आहेत. दरम्यान, जाकिर नाईक याला भारताने फरार घोषित केले आहे. त्याच्याविरोधात धार्मिक भावनांना भडकावणे आणि भारतात बेकायदा उपक्रमांना राबवण्याचा आरोप आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: zakir naik said to Muslim countries to arrest Indian