Volodymyr Zelensky
Volodymyr Zelenskyटिम ई सकाळ

...तर तिसऱ्या महायुद्धासाठी तयार राहा; झेलेन्स्कींचा गंभीर इशारा

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी संपूर्ण जगालाच याबाबत इशारा दिला आहे.
Published on

कीव्ह : रशियानं युक्रेनविरोधात प्रत्यक्ष युद्ध पुकारुन आता महिना होत आला आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी चर्चेच्या अनेक प्रयत्नांनंतरही अद्याप यावर तोडगा निघू शकलेला नाही. आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलिदिमिर झेलेन्स्की यांनी आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी वाटाघाटीसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. पण जर ही तडजोड अयशस्वी झाली तर हे तिसरं महायुद्ध असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Zelenskyy warns of third world war if talks with Putin fail)

Volodymyr Zelensky
आता तेलंगणात शिवरायांच्या पुतळ्यावरुन तणाव; नक्की काय घडलंय?

सीएनएन या अमेरिकन वृत्तवाहिनीशी बोलताना झेलेन्स्की म्हणाले, मी पुतिन यांच्याशी वाटाघाटी करण्यास तयार आहे. मी गेल्या दोन वर्षांपासून यासाठी प्रयत्न करतोय. मला विश्वास आहे की वाटाघाटींशिवाय हे युद्ध थांबणार नाही.

Volodymyr Zelensky
फुकटात 'काश्मिर फाईल्स' दाखवू नका; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचं आवाहन

"पुतीन यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी आम्हाला कोणत्याही स्वरूपाचा, कोणत्याही संधीचा वापर करावा लागेल. परंतु जर हे प्रयत्न अयशस्वी झाले तर याचा अर्थ असा होईल की हे तिसरे महायुद्ध आहे," असंही युक्रेनियन अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

Volodymyr Zelensky
...म्हणून MIM आहे साईडलाईन! आठवलेंनी कवितेतून दिली 'गाईडलाईन'

दरम्यान, रशियानं पुकारलेल्या या विध्वंसक युद्धामुळं आत्तापर्यंत दहा लाख लोकांनी युक्रेनमधील आपली घरं सोडून पळ काढला आहे. हे लोक युक्रेनच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त आहेत. संयुक्त राष्ट्र निर्वासित विभागाच्या (UNHCR) प्रमुखांनी रविवारी ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com