मतदारसंघात येऊ नका असे फोन आले, गोव्यात आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

Aditya Thackeray
Aditya Thackeray Aditya Thackeraykal

गोव्यात आज संध्याकाळी निवडणूक प्रचाराच्या थोफा थंड होणार आहेत. येत्या १४ फेब्रुवारीला मतदान पार पडत आहे. त्याआधी राजकीय घडामोडींना वेग आलाय. विविध पक्षांचे राजकीय नेते आज गोव्यात दाखल झाले आहेत.

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा गोव्यासंदर्भातील मास्टर प्लॅन सांगिलता. यावेळी संजय राऊत हे देखील उपस्थित होते. राऊत यांनी गोव्याच्या विकासाबद्दल माहिती दिली. तर आदित्य ठाकरे यांनी ११ उमेदवारांसाठी जनतेला मत देण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. मला मतदारसंघात प्रचाराला येऊ नका, असे फोन आले आहेत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. राजकीय प्रोटोकॉल असतात, असं ते म्हणाले.

पत्रकार परीषदेला खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंसोबतच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, विनायक राऊत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

Aditya Thackeray
राऊतांच्या लेटर बॉम्बवर आदित्य ठाकरेंची दोन शब्दात प्रतिक्रिया

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

  • शिवसेना भूमिपूत्रांना न्याय देणारा पक्ष

  • आमचे मित्रपक्ष सोडून गेले तरी आम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्वताच्या जीवावर लढतोय

  • गेल्या पाच वर्षात एनडीएच्या प्रत्येत मित्र पक्षाच्या पाठित खंजीर खुपसण्यात आला.

  • शिवसेना गोवा आणि प्रत्येक राज्यात लोकसभा विधानसभा निवडणूक लढवणार

  • महाराष्ट्र बाहेर शिवसेना गरज जाणवत आहे

  • मतदारसंघात येऊ नका, असे फोन आले

  • शिवसेनेचे वाघ असतात त्यांचा बाजार नसतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com