
स्तनांमध्ये पेशींच्या गाठीचा आकार जास्त प्रमाणात वाढलेला असतो, त्यावेळेस कर्करोगाचा धोका वाढलेला असतो.
बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सामान्यतः या कर्करोगाची लक्षणे लवकर दिसून येत नाही. म्हणजेच कोणताही त्रास होत नसल्याने अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, जेव्हा स्तनांमध्ये पेशींच्या गाठीचा आकार जास्त प्रमाणात वाढलेला असतो, त्यावेळेस कर्करोगाचा धोका वाढलेला असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कर्करोगामुळे होणाऱ्या महिलांच्या मृत्यूंमध्ये स्तनाचा कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. सामान्यपणे महिलांमध्ये वयाच्या चाळीशीनंतर आढळणारा हा आजार आजकाल तिशीतही दिसून येत आहे. चुकीची आणि तणावापूर्ण जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यसनाधिनता, झोपेतील अनियमितता, कमी वयात मासिक पाळी सुरु होणे, रजोनिवृत्तीतील विलंब, तिशीनंतरची गर्भधारणा आदींमुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक संभवतो. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईसह देशातील प्रमुख शहरांमधील एकूण कर्करोगाच्या प्रमाणामध्ये २५ ते ३२ टक्के प्रमाण स्तनाच्या कर्करोगाचे आहे.
महत्वाचं - रक्ताच्या गुठळीचा धोका
लक्षणे
स्तनांच्या आकारात बदल होणे
स्तनांच्या त्वचेच्या रंगात बदल होणे
स्तनांमध्ये गाठ झाल्याचे जाणवणे
स्तनाग्रांतून स्त्राव बाहेर पडणे
कारणे
स्थूलपणा ः जास्त वजन असलेल्या महिलांमध्ये..
गर्भधारणा ः आयुष्यात गर्भवती न राहिलेल्या, तसेच पस्तीशीनंतर गर्भवती राहिलेल्या महिलांमध्ये...
स्तनपान ः स्तनपान करण्यास असमर्थ असलेल्या किंवा अल्पकाळ स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये..
मद्यपान ः सातत्याने मद्यपान करणाऱ्या महिलांमध्ये..
संप्रेरक ः मासिक पाळीवेळी होणारा त्रास टाळण्यासाठी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांचा समावेश असलेला औषधोपचार घेणाऱ्या महिलांमध्ये.
काही महत्वाची आकडेवारी