ॲसिडिटी, डोकेदुखीचा आहे त्रास? मग प्या तरेट्याची कॉफी

ॲसिडिटी, डोकेदुखीचा आहे त्रास? मग प्या तरेट्याची कॉफी

नागपूर : चहा, कॉफी (Tea, coffee) अनेकांना प्यायाला आवडते. चहा, कॉफीचे सेवन केल्याने फार आराम मिळतो. अनेकांची सुरुवात याचे सेवन केल्याशिवाय होत नाही. मात्र, ॲसिडिटी आणि डोकेदुखीमुळे अनेकांना आवडत असूनही चहा, कॉफीपासून दूर राहावे लागते. यातून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रयत्न करण्यात आला आहे तरोट्यापासून तयार केलेल्या (Tarot coffee) कॉफीपासून... (Acidity-headache?-Then-drink-Tarot-coffee)

जुन्या जाणत्या लोकांना तरोटाचे गुणधर्म माहीत होते. ते त्याचा योग्यवेळी उपयोग करीत होते. कालांतराने यावर अपेक्षेप्रमाणे संशोधन न झाल्यामुळे ही वनस्पती शहरी भागातून जवळपास नामशेष झाली आहे. परंतु, शेतकऱ्यांना पिढ्यान्‌ पिढ्या याची माहिती आहे. डीजिटल जगाशी याची नाळ जुळवण्यासाठी काही बचत गटांनी एकत्र येत तरोट्यापासून कॉफी पावडर तयार करावी आणि त्याची विक्री करावी, असे ठरविले. महिलांना ही कल्पना आवडल्यामुळे त्यांनी तरोट्याच्या बिया भाजून त्यापासून कॉफी पावडर तयार केली आहे. विविध बचत गटांच्या प्रदर्शनात ही सेंद्रिय कॉफी ठेवली जात असून चवही चाखायला देतात, असे सुनंदा चरडे व कल्पना शेळके यांनी सांगितले.

ॲसिडिटी, डोकेदुखीचा आहे त्रास? मग प्या तरेट्याची कॉफी
सेना, राष्ट्रवादींवर पटोलेंचे आरोप, नंतर घुमजाव; म्हणाले...

शेतकरी कुटुंब वर्षभर शेतात राबतो. आपल्याजवळील पैसा शेतात खर्ची घालतो. दाग-दागिने गहान ठेऊन शेती करीत असतो. मात्र, निसर्ग कधी धोका देईल याचा भरवसा नसतो. क्षणात वर्षभराची मेहनत वाया जाण्याची शक्यता असते. कधी अस्मानी तक कधी सुलतानी संकटाने शेतकरी खचून जातो. पावसाचा कोणताही भरोसा नसल्याने पिकांचे कधी नुकसान होईल हे सांगता येत नाही. यामुळे पूरक उद्योगांकडे शेतकरी वळत आहे, असेही ते म्हणाले.

औषधी गुणधर्म

कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन याव्यतिरिक्त अन्य व्यवसायांकडे अलीकडच्या काळात शेतकरी वळत आहे. शहरीकरणामुळे गावाकडील नैसर्गिक चवीच्या वस्तू, वनस्पती, रसायनमुक्त शेतीमालाचे आकर्षण लोकांमध्ये वाढत चालले आहे. अनेक दुर्लक्षित; परंतु, औषधी गुणधर्माच्या वनस्पती कालौघात नाहीशा होत आहेत. तरोटा ही अशीच एक वनस्पती. काही दशकांपूर्वी शेतशिवारासह कुठेही दिसायची. मात्र, आता ही नाहीशी हेत आहे.

ॲसिडिटी, डोकेदुखीचा आहे त्रास? मग प्या तरेट्याची कॉफी
नाना पटोले अपघातग्रस्ताच्या मदतीला धावतात तेव्हा...
मुंबईला झालेल्या तीन प्रदर्शनांत आम्ही तरोट्याची कॉफी विक्रीस ठेवली होती. मुंबईकरांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला. याशिवाय काही ऑर्डरही मिळाल्या आहेत. भविष्यात इंटरनेटद्वारे विक्री करण्याचाही मानस आहे.
- सुनंदा चरडे व कल्पना शेळके

(Acidity-headache?-Then-drink-Tarot-coffee)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com