भुलथापा ‘हेल्थ फूड’ उत्पादनांच्या!

Healthy-food
Healthy-food

आपण हेल्थ फूड उत्पादनांनी गच्च भरलेल्या सुपरमार्केटमध्ये प्रवेश करतो, तेव्हा तेथील हेल्थ फूड उत्पादने आपल्याला भूरळ घालतात. आपल्यापैकी प्रत्येक जण तेथील आकर्षक पॅकिंग व मार्केटिंग गिमिकच्या जाळ्यात अलगद अडकतो. आपल्यापैकी अनेकांना आपल्यासाठी काय योग्य आहे व काय नाही, हे माहीत नसते. आपण उत्पादनाच्या लेबलवर लिहिलेले वाचून ते समजावून घेण्याचे कष्ट घेत नाही. आपल्या आवडत्या प्रोटिन बारमध्ये नक्की कोणत्या पदार्थांचा समावेश असतो किंवा ‘लो कार्ब’ चिप्सच्या बॅगमध्ये काय असते हे जाणून घेण्याचे कष्ट आपण घेतच नाही. 

तुमच्यासाठी फारशा चांगल्या नसलेल्या पदार्थांची यादी पुढे दिली आहे. 

१) ब्राऊन शुगर, केन शुगर, कोकोनट शुगर, गूळ व मध 
हे सर्व विविध स्वरुपातील साखरेचेच प्रकार आहेत. प्रसिद्ध ब्रॅण्डपैकी ९० टक्के आपण रिफाइंड शुगर वापरत नाही, असा दावा करतात. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असतो, आम्ही ब्राऊन शुगर, केन शुगर, कोकोनट शुगर, गूळ किंवा मध वापरतो. तुम्ही खरेदी करीत असलेल्या उत्पादनावर काय लिहिलेले आहे, हे नीट तपासून पाहणेच श्रेयस्कर. 

२) सोया लेसिथिन - एक प्रिझर्व्हेटिव्ह, बाईंडिंग एजंट 
हा अॅडिटिव्ह सोयापासून मिळवलेला अर्क आहे. या मुळे काही काळानंतर पोट फुगणे व आतड्याच्या जळजळीचे लक्षणे (इरिटेबल बोल सिंड्रोम) दिसून येतात. मात्र, या प्रिझव्हेटिव्हमुळे तुम्ही खरेदी केलेले उत्पादन १० ते १२ महिने टिकते, हे खरे! 

३) राइस ब्रान ऑइल - पदार्थांची चव वाढविणारा आणि सेल्फ लाइफ वाढविणारा एजंट 
मोठ्या प्रमाणातील उष्मांक, घातक पिष्टमय पदार्थ, मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेला पदार्थ. तुम्ही हा कमी उष्मांक असल्याचा दावा केला जात असलेला पदार्थ वजन कमी करण्यासाठी वापरणार असल्यास हा अत्यंत अयोग्य पर्याय आहे... 

४) डार्क चॉकटेल 
‘नो अॅडेड शुगर’ असा दावा करणारी बहुतेक हेल्दी उत्पादन त्यामध्ये डार्क चॉकलेटच्या स्वरूपात साखरेचा समावेश करतात. डार्क चॉकलेट म्हणजेच साखर! त्यामुळे तुम्हाला सल्ला आहे, की तुमच्या ‘मुसेली’च्या पॅकच्या मागील बाजूस डार्क चॉकलेट किंवा कॅनबेरीज लिहिलेले असल्यास त्यापासून दूरच राहणे फायद्याचे. 

५) सोडिअम ऊर्फ मीठ 
मीठ पदार्थाची चव वाढविणारा व छुपा प्रिझर्व्हेटिव्ह आहे. तुमच्या खाऱ्या शेंगदाणे किंवा काजू व पिस्त्याच्या पॅकमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ घातलेले असते व त्याची चव तुम्हाला पुढच्या आठवड्यात ते उत्पादन पुन्हा खरेदी करण्याची चटकही लावते. यावर उपाय म्हणजे, या पदार्थांचा साधा पॅक खरेदी करा व घरी आणून तुमच्या स्वयंपाकघरामध्ये, तुमच्या सोयीच्या वेळी अगदी कमी मिठावर त्याला भाजा. 

नव्या वर्षात हा संकल्प करा....खऱ्या अन्नघटकांचा पुन्हा एकदा शोध घ्या. कॉप्लेक्स कार्बोहार्डेस असलेली ताजी फळे, भाज्या, न भरडलेली धान्ये यांचा आहारात समावेश करा. 

शौमा मेनन, संस्थापक, किलोबाईट्स 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com