माझा फिटनेस : ‘गरजेपुरतेच अन्नसेवन’

Madhavi-Nimkar
Madhavi-Nimkar

आरोग्याकडे लक्ष देणे सध्याच्या काळामध्ये खूपच गरजेचे बनले आहे. त्यातच कोरोनाचे संकट असल्याने आरोग्य किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव प्रत्येकाला झाली असेल. लॉकडाउनच्या कालावधीत चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण बंद असल्याने मी एक दिवस योगासने, तर एक दिवस ‘क्रॉसफिट’ प्रकार करत होते. आता मी योगा आणि रनिंग करते. ‘अष्टांग योग’ मला खूप आवडतो. त्याचप्रमाणे आसनांचे नवनवीन प्रकारही शिकायला आवडतात. त्याचा फायदा शरीरातील ऊर्जावाढीसाठी होतो तसेच वजनही कंट्रोलमध्ये राहते. शरीरयष्टीही लवचीक आणि हेल्दी राहते. मी दिवसातला एक तास योगासनांसाठी देते. सकाळी वेळ न मिळाल्यास दिवसभरात कधीही योगासने करते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी योगासनांबरोबरच डाएटही सांभाळते. आपल्या शरीराला जेवढ्या प्रमाणात अन्नाची गरज असते, त्या प्रमाणात अन्नसेवन करणे, हेच माझ्या डाएटचे सूत्र आहे. प्रोटिन, व्हिटॅमिन ‘सी’ शरीरात जाण्यासाठी मी प्रयत्न करते. दररोज बाटलीभर लिंबू-पाणी पिते. त्वचेसाठी डाळिंब खाते. त्याचप्रमाणे अक्रोड, बदाम यांचाही आहारात समावेश असतो. एक केळ व सिझनल फळांचाही आहारात समावेश असतो. 

मी सकाळी साडेआठ वाजता भरपेट नाश्‍ता करते. दुपारी एक ते दीडच्या सुमारास जेवण करते, तर संध्याकाळी साडेसातच्या आत जेवण करते. त्यानंतर काहीही खात नाही. मात्र, दिवसभरात कधी भूक लागली, तर फळे खाण्यावर माझा भर असतो. बिस्कीट, कॉफी किंवा चहा घेऊन भूक मारत नाही. साखरेचे प्रमाण शरीरात योग्य प्रमाणात राहण्यासाठी दोनदा चहा पिते. 

जेवणामध्ये एक पोळी, भाजी, डाळ, ताक, सॅलड, बीट, खजूर यांचा समावेश असतो. त्यामुळे शरीराला जेवढ्या गोष्टी आवश्‍यक आहेत, त्या मला मिळतात. घरातल्या घरातील अन् योग्य आहार घेण्यावर माझा भर असतो. योगासने अन् योग्य आहारामुळे माझे शरीर हेल्दी अन् मन आनंदी राहते. त्यामुळे प्रत्येकानेच दिनचर्या आखून व्यायाम, योगासने अन् आहाराच्या वेळा पाळाव्यात. त्यातून आयुष्यभरासाठी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.

माझ्या टिप्स...

  • योगासनांमुळे शरीरातील ऊर्जा वाढते. नियमित योगासने करा.
  • प्रोटिन व ‘व्हिटॅमिन सी’ शरीरात जातील, असा आहार ठेवा. 
  • ड्राय फ्रुट्स व सिझनल फळे खा.
  • बिस्किटे, चहा, कॉफी टाळा.
  • आपली दिनचर्या आखून तिचे पालन करा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com