योग ‘ऊर्जा’ : सर्वे सन्तु निरामया:

Yoga
Yoga

आपण २०२० चं संपूर्ण वर्ष दर मंगळवारी याच ठिकाणी आपण ‘योग’ हा विषय अनेक अंगांनी समजून घेतला. मुळात योग का करावा हे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक दृष्टीने पाहिले. त्यात विविध आसने, प्राणायाम, शुद्धिक्रिया इत्यादी तत्त्वांचा उपयोग, डाएट कसा असावा, ध्यानाचा शास्त्रीय दृष्ट्या होणारा लाभ, हठयोगातील साधक-बाधक तत्त्वे, पातंजल योगसूत्रातील अष्टांगयोगही पहिला.

योग सरावाने प्रतिकारशक्ती कशी वाढविता येईल, झोपेचे महत्त्व, सूर्यनमस्काराचे महत्त्व, पाठीचे आरोग्य, पचनाचे-श्वसनाचे आरोग्य, वजन कमी कसे करायचे, मासिक पाळीसंबंधीचे आरोग्य, व्हेरिकोज व्हेन्स, लॉकडाउनसारख्या अवघड परिस्थितीतही सराव कसा टिकवता येऊ शकतो, व्यायाम-योगासनातील फरक, ज्येष्ठांसाठी योग, योग सरावात होणारी इजा व घ्यायची काळजी, योगात व्यत्यय आणणारे घटक, योगाने कार्यक्षमता कशी वाढवता येईल, विविध विकारांवर योग थेरपीचा उपयोग हे सर्व व आध्यात्मिक उद्देश बाजूला न ठेवता या सर्वांचा जो अभ्यास होतो तोच खरा ‘योग’ नाही, तर फक्त कवायत! या सर्व गोष्टी नीट समजून घेतल्या.

वर्षअखेरी... २०२१चे स्वागत!
आपल्यातील बहुतांश लोक साधारण या काळात वर्षभराचा आढावा घेतात - काय ठरवले होते, त्यातील काय साध्य केले व पुढील वर्षी साधण्याच्या गोष्टींची लिस्ट ३१ डिसेंबरपर्यंत तयार होतेच. यावर्षी भौतिक प्रगतीबरोबरच आंतरिक प्रगतीचे ध्येय निश्चित करा. शारीरिक-मानसिक आरोग्यापासून पुढे आतील प्रवासाची सुरुवात म्हणजे वाचन, ध्यानसाधना करता करता आंतरिक आरोग्याकडे! या वर्षाने आपल्याला बरेच काही शिकवले. जे योगसाधना नियमित करतात त्यांना २०२०च्या वातावरणाचा त्रास नक्कीच कमी झाला आहे. कारण, योगाभ्यासाने त्यांच्या मनाची परिस्थिती स्वीकारण्याची तयारी आणि सहनशीलता विकसित झाली आहे. बाहेरच्या परिस्थितीने त्यांचे मन डगमगले नाही किंवा काही सैरभैर व कमकुवतही नाही झाले. Strong mind in a strong body हे ध्येय ठेवून, नवीन ऊर्जा घेऊन आता मनावरचे सावट दूर करा आणि आनंदाने २०२१मध्ये तुमच्या नवीन ‘evolved version’साठी प्रयत्न सुरू ठेवा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोविड पश्चात...
तुम्हाला कोरोना झाला असो वा नसो, आपल्या सर्वांना आता निसर्गाने दाखवून दिले आहे, की प्रतिकारशक्ती किंवा मानसिक स्वास्थ्य, याचे उत्तर बाहेर नव्हे; तर आपल्या आतच आहे. तेव्हा आता ढिलाई नको. माणूस आजचे उद्यावर ढकलण्यात एक्स्पर्ट असतो. ती सवयच बदलायला लागूया. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे त्यांना retraining and regaining the fitness statusची नितांत गरज आहे. जखमी सैन्याला लगेच युद्धावर पाठवणे योग्य नाही, तसेच जरा बरे वाटले म्हणून पुन्हा स्वतःला गृहीत धरू नका. अजूनही पूर्णपणे हा व्हायरस व त्याचे खोलवर होणारे पडसाद आपल्याला माहीत झालेले नाहीत, संशोधन सुरू आहे. त्यामुळे आसन व प्राणायाम यांचा योग्य मार्गदर्शनाखाली केलेला अभ्यास कोरोना झालेल्यांना करणे अत्यंत गरजेचे आहे. आज कोविड आहे, नंतर कधीतरी वेगळ्या रूपात काहीतरी म्युटेशन होऊन किंवा नवीन व्हायरस येऊ शकतो. यापूर्वीही वेगवेगळ्या स्वरूपात अशी परिस्थिती येऊन गेली आहे. त्यामुळे नेहमीच तयारीत असलेल्या सैनिकासारखे सज्ज राहणे आपल्या व आपल्या कुटुंबाला गरजेचे आहे.

जग हदरवणाऱ्या कोविडसारख्या या महासंकटाला जरा बाजूला ठेवू; पण दैनंदिन जीवनात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतुबदलानुसार आणि जीवनशैलीमुळे येणाऱ्या छोट्या-मोठ्या आजारांशी दोन हात करायलाही सक्षम राहायला हवेच ना?
सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया: |
याच नववर्षाच्या शुभेच्छा !!!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com