योग ‘ऊर्जा’ : स्वतःची ओळख

Devyani-M
Devyani-M

योगातील तांत्रिक भाग आणि आसन, प्राणायाम, ध्यान, क्रिया, मुद्रा, बंध इत्यादी पद्धती प्रस्थापित असल्या; तरी त्यांचं कॉम्बिनेशन आणि उपयोग कशा कौशल्यानं योगशिक्षक करतो, त्यानुसार त्या पद्धती प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याच्या गरजेनुसार परिवर्तन दाखवू लागतात. सामूहिकरीत्या योगवर्गांत प्रत्येकाला हवे ते योग बरोबर देतोच; परंतु अनेकदा असे दिसून येते, की काहींना ग्रुपमध्ये हरविल्यासारखे वाटते किंवा त्यांच्याकडे विशेष लक्ष जावे आणि त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार सराव करावा, असे वाटते. या गरजा आरोग्याच्या कोणत्यातरी समस्या असतील, तर त्यांच्यासाठी थेरपीच्या स्वरूपात योग उपयोगी ठरतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विविध क्षेत्रे आणि योग 
गरोदर स्त्रियांसाठी व डिलिव्हरीनंतर असे विशेष योग वर्ग लागतात. कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदांवरील व्यक्तींच्या समस्या वेगळ्या असतात, त्यांच्या हाय फंक्शनिंग दिवसामध्ये योगाचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. अँग्झायटी, डिप्रेशनसारखे विकार, पौगंडावस्थेतील मुला-मुलींच्या समस्या, तणावयुक्त जीवन जगणारे, कोणाला वजन कमी करायचेय, तर काहींना आध्यात्मिक प्रगतीसाठीचे मार्गदर्शन हवे असते. विविध क्षेत्रांतील स्पर्धा परीक्षांसाठी झोप, तहान, भूक विसरून तासन् तास एका जागी बसून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या वेगळ्या, तर टुरिंगचा जॉब असणारे, दीर्घकाळ उभे राहून काम करणारे आपले पोलिस बंधू-भगिनी आणि डॉक्टर्स-नर्सेस यांच्या गरजा वेगळ्या.

योग आणि रिकव्हरी
पाठ, मान, कंबर, खांदे, गुडघे इत्यादी सांध्यांच्या तक्रारी किंवा पचनाच्या तक्रारी तर काहींना श्वसनाचे विकार, अशांसाठी योग थेरपी जरुरी आहे. तसेच, कॅन्सरवर चालू असलेल्या रेडिएशन व किमोथेरपीसारख्या - पेशींना आतून पोखरणाऱ्या - उपचारांबरोबरच जोडीला हलक्या प्रकारे केला गेलेला योग थेरपीचा उपयोग रिकव्हरीमध्ये व झालेली झीज भरून काढण्यात कमालीची साथ देतो. नुसतीच शरीराची रिकव्हरीच नाही, तर उपचारांबरोबरीने व्यवस्थित मार्गदर्शनाखाली केलेला योगाभ्यास हा मनाला उभारी, खंबीरपणा आणि सकारात्मकता आणतो. ज्याने आपण सतत ‘आजारी’ आहोत, अशी भावना कमी होऊन लवकर बरे होण्याची ताकद व उमेद मिळते.

योग आणि अध्यात्म
हे सर्व शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने मिळणारे योगाचे फायदे पाहिले. मात्र, जसे मी नेहमी म्हणत आले आहे, की शारीरिक आरोग्य हे अंतिम ध्येय नसल्याने योगाचा मूळ गाभा आहे स्वतःची म्हणजे ‘मी’ (Self) याची पारदर्शकतेने ओळख करून घेणे आणि "I" to "I am that" कडे जाणे. त्यासाठी शरीर-मनाला न कवटाळून त्यांच्या पलीकडे जाण्याची म्हणजे 'Transcending the Body and Mind' याची तयारी व अभ्यास सुरू व्हायला हवा. त्यामुळे आध्यात्मिक उद्देशांना बाजूला ठेवून योग होऊच शकणार नाही. आणि झाला तरी तो योग नव्हे, कवायत ठरेल. मी कोण आहे, माझ्या आयुष्याचे प्रयोजन काय, माझे ध्येय काय या विचारांचा मनात शिरकाव होत असल्यास ही सुरुवात समजावी. याच 'Self-Inquiry' चा ध्यास घेत आपला प्रवास सुरू होईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com