माझा फिटनेस : शुगरलेस खाण्यावर भर

Rutuja-Limaye
Rutuja-Limaye

फिटनेस आणि वेलनेस, या गोष्टी आज अतिशय महत्त्वाच्या बनल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून आपण कोरोनाचा सामना करत आहोत. या काळामध्ये आरोग्य किती महत्त्वाचे आहे, याची कल्पना सर्वांना आली असेल. मी सुरुवातीपासूनच फिटनेसबाबतीत जागरूक आहे. सकाळी उठल्यावर ध्यानधारणा करते. त्यानंतर चाळीस मिनिटे योगासने करते. या गोष्टी झाल्यानंतर नाश्त्यामध्ये उपीट, सलाड, ओट्स खाते. आपल्या शरीरात जास्तीत जास्त प्रोटीन कसे जाईल, यावर माझा भर असतो. मात्र मॅगी, पोहे या गोष्टी अजिबात खात नाही.

खायचे नसल्यास शुगरलेस कॉफी पिते किंवा ब्लॅक टी, ग्रीन टी पिते. मात्र, साखरेचे पदार्थ टाळते. स्किनवर ग्लो राहण्यासाठी साखर कमी करण्याचा सगळ्यात चांगला पर्याय आहे. दुपारच्या जेवणामध्ये पनीर, कडधान्य, पालेभाज्यांचा समावेश असतो. मी पोळी कमी खाते; मात्र भाजी जास्त खाते. दुपारी मी एक तास डान्स करते. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार मला करायला आवडतात. कारण, नृत्य ही माझी पहिल्यापासूनच आवड आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संध्याकाळी जिमला जाण्यापूर्वी सिझनल फळ खाते. सहा ते आठ दरम्यान मी जिममध्ये असते. त्या वेळी लेग्जवर जास्त भर देते. वेट्सपेक्षा फ्लोअर वर्कआउटवर माझा भर असतो. वेट किती जास्त उचलतो, हे महत्त्वाचे नाही. मी कमी वेट घेऊन रिपिटेशन जास्त करते. ॲब्ज आठवड्यातून तीन ते चार वेळेस करते. दिवसभरात खाल्लेल्या कॅलरी कमी करणे खूप गरजेचे असते. त्यासाठी मी ट्रेड मिल करते. वर्कआउटनंतर प्रोटिन घेणे गरजेचे असते. कारण, प्रोटीन पचण्यास जड असते. रात्रीच्या आहारामध्ये प्रोटीन्सचा समावेश असतो. हे झाल्यानंतर मी आठ तास झोप घेते.

सध्या मी एका वेबसीरिजसाठी काम करत आहे. लॉकडाउननंतर मी ‘बाळूमामाच्या नावानी चांगभलं’ आणि ‘जयदेवा श्री गणेशा’ या मालिकांत अभिनय केला. मात्र, आत्तापर्यंत मला कोणत्याही भूमिकेसाठी वजन कमी-जास्त करावे लागले नाही. कारण, मी पहिल्यापासूनच नृत्य करते. त्यामुळे माझे वजन मेन्टेन राहण्यास त्याचा हातभार लागला. त्याचप्रमाणे मी राज्यस्तरीय रोप मल्लखांब खेळाडूही आहे. खेळांची आवड मला पहिल्यापासूनच आहे. त्याचा उपयोग मला अभिनय क्षेत्रासाठी झाला. प्रत्येकाने आयुष्यात फिट राहण्यासाठी खेळांबरोबरच योगासने, प्राणायाम आणि व्यायाम या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यामुळे तुम्ही हेल्दी राहाल आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या कुटुंबीयांवरही होईल.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com