खजूर खाल्यास 'या' आजारांना दूर ठेवू शकता तुम्ही...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 डिसेंबर 2019

खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत. खजूर हे अंत्यत पौष्टिक खाद्य आहे. खजूर खाल्याने अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. 

पुणे : खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत. खजूर हे अंत्यत पौष्टिक खाद्य आहे. खजूर खाल्याने अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. यामुळे शरीराला ताकद मिळते तसेच  शरिराचा लवकर विकास होतो. जास्त शुगर क्रेव्हिंग त्यांच्यासाठीही खजूर उत्तम पर्याय ठरू शकतो.

ऊर्जा मिळते - खजुरात व्हिटॅमिन ए, बी १, बी२, बी ३,बी ५ आणि विटॅमिन सी असते. खजूर खाल्ल्याने ऊर्जा मिळते. तसेच थकवा दूर होतो. खजूर खाल्ल्यानंतर काही दिवसांतच फायदा व्हायला लागतो. अनेक आजार खजूर खाल्याने आपण टाळू शकताे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पचनक्रिया चांगली राहते- नेहमीच पोट फुगण्याचा किंवा अपचनाची समस्या असणार्यांसाठी खजूर खाणे खुप उपयोगाचे आहे. खजूर खाल्ल्यास अनेक समस्या दूर होतात. वस्तुत: खजुरातील फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते. २-३ खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे त्यांची पचनक्रिया चांगली राहते आणि त्यांना पोषणदेेखील मिळते.

रक्त वाढण्यास मदत- अॅनिमिया झाल्यास डॉक्टर खजूर खाण्याचा सल्ला देतात. याने शरीराला पुरेसे लोह मिळते. ज्या मुलांना अॅनिमिया आहे त्यांच्यासाठी खजूर फायद्याचे आहेत. तुमच्या मुलाच्या छातीत दुखत असेल खजूराने फायदा होईल.

मज्जासंस्थेला बळकटी- खजुरामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. सोबतच यामध्ये सोडियमदेखील आढळते. ही दोन्ही पोषक द्रव्ये मज्जासंस्था योग्य पद्धतीने काम करण्यात मदत करतात. यामुळे मेंदूचा विकास होतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खजूर मिल्कशेक- सर्वप्रथम खजुराच्या बिया काढून छोटे टुकडे कापून घ्या. ते ब्लेंडरमध्ये दूध टाकून वाटून घ्या. आता उर्वरित दूध, साखर आणि वेलची पावडर वाटून घ्या. यात आइस क्यूब टाकून चांगले फेटा. ग्लासात काढा आणि बर्फ टाकून खजूर मिल्कशेक सर्व्ह करा. हिवाळ्यात यात न टाकता सेवन करा.

खजुर बर्फी- खजुरातील बिया काढून टाका. ते मिक्सरमधून बारीक करा. सुका मेवा आणि खसखस थोडी भाजून घ्या. एका भांड्यात तूप टाका. तूप गरम झाल्यानंतर त्यात वेलची पावडर व खजुराचे मिश्रण टाका. हे थोडा वेळ मध्यम आचेवर शिजवा. आता यामध्ये सुका मेवा व खोबरे टाका. हे थोडे ड्राय होईपर्यंत चमच्याने हलवत राहा. एका प्लेटमध्ये तूप टाकून हे मिश्रण त्यामध्ये टाका. दोन-तीन तासानंतर याचे मनपसंद आकारात कापून घ्या. खसखस व सुका मेवा टाकून सर्व्ह करा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Benefits of eating dates

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: