पोटाच्या विकारांपासून तर वजन कमी करण्यापर्यंत फायदेशीर बुरशीजन्य पदार्थ

benefits of eating mushrooms
benefits of eating mushrooms

नागपूर - मशरूम म्हणजे खाण्यायोग्य, जीवनसत्वापूर्ण, कॅलरीज असणारी बुरशी असते. यामध्ये वनस्पतीमध्ये आढळत नाही असे ड जीवनसत्व असते. मशरूम फळांप्रमाणे ग्लुटेन फ्री असतात. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडन्ट्स असतात. याशिवाय सेलेनियम, कॉपर यासारखी खनिजे आणि पोटॅशिअम देखील असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मशरूम उपयोगी ठरू शकते.

ब जीवनसत्वाचा स्त्रोत - आता कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी डॉक्टर क आणि ब जीवनसत्व असलेले आहार घेण्याचा सल्ला देतात. त्यासाठी मशरूम हे एक चांगला पर्याय ठरू शकतं. कारण मशरूम हे ब जीवनसत्वाचा चांगला स्त्रोत आहे.

मशरूम खाण्याचे फायदे 

  • कँसरचा धोका टळण्यास मदत - मशरूममध्ये बीटा ग्लाइसीन आणि लिनॉलिक अ‌ॅसिड असते. त्यामुळे प्रोस्टेट आणि ब्रेस्ट कँसरचा धोका कमी असतो.
  • वजन कमी करणे - दररोज तुम्ही मशरूमचे सेवन करत असाल तर तुमचे वजन फार लवकर कमी होईल. मशरूमला उकळून सकाळच्या नाश्त्यामध्ये घेतल्यास फायदेशीर असते.
  • पोटाचे विकार - मशरूममध्ये मोठअया प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे मशरूमचे सेवन केल्यास अपचन, पोटदुखी, गॅस, अ‌ॅसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

मशरूमचा उपयोग -
मशरूम पटकन शिजतात. सूप, पुलाव, भाज्या, पिझ्झा यामध्ये मशरूमचा वापर केला जातो. फक्त मशरूम खाण्यायोग्य आहेत की नाही हे बघून घ्यावं लागतं. कारण काही मशरूम विषारी असतात.

मशरूमचे उत्पादन - 
मशरूम ही फळभाजी पूर्णपणे सेंद्रीय आहे. हे तयार करताना रासायनिक पदार्थांचा वापरच होत नाही. उत्तर भारतात मशरूमध्ये उत्पादन होते. तसेच दक्षिण भारतातील तमिळनाडू, कर्नाटक परिसरातही मशरूमचे उत्पादन घेतले जाते. 

मशरूम कसे तयार केले जाते? - 
सोयाबीन किंवा गव्हाची गुळी तसेच साखर कारखान्यात शिल्लक राहिलेला ऊसाचा चोथा याचा मशरूम तयार करताना उपयोग होते. या कच्च्या मालाचे २५ दिवसात खत तयार केले जाते. त्यामध्ये कोंबडीची विष्ठा, जिप्सम, डिओसी घातले जाते. हे सर्व केल्यानंतर ५० दिवसांमध्ये मशरूमचे उत्पादन घेता येते. त्यानंतरच्या १० ते १५ दिवसांत मशरूम विक्रीसाठी नेले जाते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com