Strong Teeth: कडुनिंबाच्या काडीने दात होतात मजबूत; जाणून घ्या फायदे

Benefits of brushing teeth with neem stick: कडुलिंबाच्या काडीने दात साफ केल्यास दात स्वच्छ आणि मजबूत राहतात.
Benefits of brushing teeth with neem stick
Benefits of brushing teeth with neem stickEsakal

कडुनिंबाच्या काडीने दात घासण्याचे फायदे (Benefits of brushing teeth with neem stick):

सध्या बाजारामध्ये अनेक कंपन्यांच्या टुथपेस्ट (Toothpest) उपलब्ध आहेत. परंतु त्यांचा नियमित वापर करूनही दातांच्या समस्या (Dental problems) उद्भवतात. परंतु बाजारात टूथपेस्ट येण्यापूर्वी भारतात दात साफ करण्यासाठी अनेक पारंपारिक पद्धतींचा वापर केला जाई. यापैकी एक म्हणजे कडुनिंबाच्या काडीने (Neem Sticks) दात घासणे. कडुनिंबाचे फायदे सर्वश्रुत आहेत आणि ज्यांनी त्याचा वापर केलाय त्यांना त्याचे फायदे स्पष्टपणे जाणवतात. आजही आपल्याला अनेक वृद्ध माणसे आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी वयाची नव्वदी-शंभरी गाठली असतानाही त्यांचे दात चांगले असतात आणि त्यांच्या या दीर्घायुष्याच्या कारणांपैकी एक म्हणजे त्यांच्या दातांचे आरोग्य चांगले असणे हे आहे. पूर्वीचे लोक दात घासायला कडूनिंबाच्या काडीचा वापर करायचे. त्यामुळे त्यांच्या दातांचे आरोग्य राखले जायचं. कडूनिंबाचे नेमके काय फायदे आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत.

Benefits of brushing teeth with neem stick
श्रीखंड आणि कडूनिंब! 

1. कडुलिंबाची काडी (Neem stick benefits fro Health):-

कडुलिंबाचा उपयोग जुन्या काळापासून केला जात आहे. आयुर्वेदामध्ये (Ayurveda) कडुलिंबाला (Neem) खूपच फायदेशीर सांगितले गेले आहे. असे मानले जाते की कडुलिंबाच्या काडीने दात साफ केल्यास दात स्वच्छ आणि मजबूत (Clean and Strong Teeth) राहतात, याच्या वापराने पचन क्रिया (Digestion) देखील सुधारते.

2. दात किडत नाहीत (Protect Teeth from Decay) :-

जर तुम्ही नियमितपणे कडूनिंबाच्या काडीने दात घासत असाल तर दातांमध्ये कीड लागत नाही. यामागे हे मुख्य कारण आहे आहे अशा काड्यांपासून दात घासण्यामुळे तोंडातील विषाणू नष्ट होतात. यामुळे चांगल्या प्रकारे दात आणि जीभ साफ होते आणि दातांची किडीपासून सुरक्षा होते.

3. हिरड्या मजबूत बनवते (Strengthens the gums) :-

कडुलिंबाची काडी दात घासण्यासाठी सर्वात चांगली मानली जाते. यामागे हे कारण आहे कि कडुलिंबाच्या काडीपासून नियमित दात साफ केल्यास हिरड्यांमध्ये मजबूत येते आणि दात साफ राहतात.

Benefits of brushing teeth with neem stick
Health Tips - भाऊ, व्यायाम शास्त्र समजून घ्या

4. दातांची समस्या दूर होतात (Relief from Dental problems):-

आजच्या बदलत्या लाईफस्टा‍ईलमध्ये काहीही आणि केव्हाही खाणे दातांसाठी नुकसानकारक असते. अशामध्ये दातांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या जाणवतात. अशामध्ये पायरीया समस्या होणे देखील सामान्य आहे. पण कडूनिंबाच्या काडीने दात साफ केल्यास या समस्यांपासून दूर राहता येते.

5. नॅचरल माऊथ फ्रेशनर (Natural Mouth Freshner):-

कडूनिंबाच्या काड्या (Neem) नैसर्गिक नॅचरल माऊथ फ्रेशनर म्हणून देखील काम करतात. खासकरून कडुलिंबाच्या काडीने दात घासल्यास तोंडातून येणारी दुर्गंधी नाहीशी होते. ज्या लोकांच्या तोंडामधून दुर्गंधी येते त्यांच्यासाठी हा खूपच फायदेशीर उपाय आहे. यासाठी सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात साफ करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com