पुरुषांच्या तब्येतीसाठी सर्वोत्तम आहार काय? जाणून घ्या 10 हेल्दी पदार्थ

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 23 October 2020

सध्या कोरोनामुळे बऱ्याच जणांच्या आहारात बदल झाल्याने त्यांच्या तब्येतीवर मोठा परिणाम होताना दिसत आहे.

पुणे: सध्या कोरोनामुळे बऱ्याच जणांच्या आहारात बदल झाल्याने त्यांच्या तब्येतीवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. विषेशतः पुरुषांनी सध्या कोणता आहार घेतला पाहिजे यावर आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. एकंदरीत तरुणांनी आणि पुरुषांनी आहारात कोणत्या घटकांचा समावेश केला पाहिजे या बद्दलची माहितीही आपण जाणून घेणार आहोत.

1. लसूण- 
पुरुषांनी जर त्यांच्या आहारात लसणाचा समावेश केला तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. लसूणाचा समावेश आपल्या आहारात केला तर त्याचा आरोग्यालाही खूप फायदा आहे. तसेच लसूण आरोग्यवर्धकही असते. 

2. आले-
आलं हे सर्दी आणि खोकल्यावर हे गुणकारी आहे. या समस्यातून सुटायचे असेल तर आलं खूप फायदेशीर ठरते.

3. हिरव्या पालेभाज्या- 
हिरव्या पालेभाज्याच्या सेवनाचा मोठा फायदा पुरुषांना होतो. यामध्ये शरीराला गरजेचे असणारे पौष्टिक घटक असतात. तसेच केसांसाठीही हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनाचा मोठा फायदा होतो.

4. दूध-
पुरुषांनी जर दुधाचा समावेश आहारात केला तर ते मोठे आरोग्यवर्धक ठरते. शरीराला याचा फायदाही मोठा होतो. तसेच दुधाचे इतर फायदेही खूप आहेत.

कोरोनाकाळात 'Vitamin K'चं सेवन आहे आवश्यक; वाचा काय आहेत फायदे

5. डार्क चॉकलेट-
बॉडीबिल्डिंगमध्ये डार्क चॉकलेच्या सेवनाचा मोठा फायदा होतो. तसेच ते बीपीवरही गुणकारी आहे.

6. पिस्ता-  
यामध्ये स्टेरॉलचे प्रमाण चांगले असते, जे पुरुषांच्या शरीरासाठी महत्वाचे आहे. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलही संतुलित राहते.

7. बेदाणे-
पुरुषांनी त्यांच्या आहारात बेदाण्यांचा समावेश केला पाहिजे. कारण हे पुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवण्यासाठी मोठी मदत करते.

8. केळी-
उच्च रक्तदाबावर केळीचे सेवन खूप फायदेशीर ठरते. 

Navratri 2020: उपवास असेल तर काय खावं आणि काय टाळावं

9. रेड मीट-
याचे सेवन केल्याने शरीरातील प्रोटीन वाढण्यास मदत होते. 

10. बीट-
बीट खाणे शरीरासाठी गुणकारी आहे. याचे सेवन रक्ताच्या वाढीसाठी चांगले असते.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: best diet for men health Know 10 Healthy Foods