कोरोनाकाळात 'Vitamin K'चं सेवन आहे आवश्यक; वाचा काय आहेत फायदे

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 22 October 2020

निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला व्हीटॅमिनची मोठी गरज असते. आपल्या शरीरात जर व्हीटॅमिनची कमतरता असेल तर बऱ्याच आजारांना सामोरं जावं लागतं.

पुणे: निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला व्हीटॅमिनची मोठी गरज असते. आपल्या शरीरात जर व्हीटॅमिनची कमतरता असेल तर बऱ्याच आजारांना सामोरं जावं लागतं. तसेच सध्याचा काळ कोरोनाचा असल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण कोरोनाचा व्हायरस कमी प्रतिकारशक्ती असणाऱ्यांवर लगेच आक्रमण करू शकतो.  

व्हीटॅमिनचे प्रकार A, B, C, D, E आणि K आहेत, ज्याची आपल्या शरीराला मोठी गरज असते. पण त्यातल्या त्यात व्हीटॅमिन Kची गरज आपल्या शरीराला मोठी असते. व्हीटॅमिन Kचे दोन प्रकार K1 आणि K2 आहेत. व्हीटॅमिन K1 हिरव्या पालेभाज्यातून आपल्या शरीराला मिळते तर K2 शरीरातच तयार होत असतात. यामुळे हिरव्या पालेभाज्या खाण्यावर सर्वांनी भर दिला पाहिजे.  

Navratri 2020: उपवास असेल तर काय खावं आणि काय टाळावं

व्हीटॅमिन Kच्या कमतरतेमुळे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. शरीरात इजा झाल्यानंतर अधिक रक्तस्त्राव होऊ नये यासाठी व्हीटॅमिन K महत्वाचे आहे. हे रक्तातील प्रोथोम्बिन नावाच्या प्रथिनामुळे होते. हे प्रथिन तयार करण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन Kची गरज असते.

शरीरात व्हिटॅमिन Kची कमतरता असेल तर तुम्हाला हृदयविकारचा धोका होऊ शकतो. अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कर्करोगासारखा जीवघेणा आजारही होऊ शकतो. किंबहुना, मानवी आतड्यांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन K2 यांचा थेट संबंध धमनीच्या कॅल्सिफिकेशनशी होतो. त्याच्या अभावामुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे हिरव्या भाज्यांचे सेवन करावे कारण त्यांच्यात भरपूर व्हिटॅमिन K असते.

शरीरात व्हिटॅमिन A ची कमतरता असेल तर करा या पदार्थांचा आहारात समावेश

व्हिटॅमिन Kच्या कमतरतेमुळे हाडांचे आजारही होऊ शकतात. व्हिटॅमिन कKच्या कमतरतेमुळे ऑस्टिओ-पोरोसिसच्या समस्या उद्भवू शकतात. जर शरीरातील  व्हिटॅमिन Kचे प्रमाण वाढवायचे असेल तर आपल्या आहारात दही, पालक, किवी, अॅव्होकॅडो, डाळिंब, हिरवे मटार, लिंबू, गाजर, बदाम, चिकन, अंडी, ब्रोकोली, कोबी आणि बीटचा समावेश केला पाहिजे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vitamin k is needed to body during corona time