esakal | बर्ड फ्लूचा धोका वाढतोय; संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी 5 गोष्टी टाळा
sakal

बोलून बातमी शोधा

bird flu

बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांवरच नाही तर मानवी आरोग्यवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कोंबड्या आणि बाधित पक्ष्यांच्या संपर्कात आल्याने व्यक्तींना त्याची बाधा होऊ शकते.

बर्ड फ्लूचा धोका वाढतोय; संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी 5 गोष्टी टाळा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - कोरोनाने थैमान घातले असताना देशातील पाच राज्यांमध्ये बर्ड फ्लूची प्रकरणे आढळली आहे. राजस्थान, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात बर्ड फ्लूमुळे स्थलांतरीत पक्षांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. राजस्थानातही अशीच परिस्थिती असून वेगवेगळ्या जिल्ह्यात 170 पेक्षा जास्त पक्ष्यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित भागांमध्ये चिकन, अंडी, मांस खाण्यास बंदीही घातली गेली आहे. 

बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांवरच नाही तर मानवी आरोग्यवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कोंबड्या आणि बाधित पक्ष्यांच्या संपर्कात आल्याने व्यक्तींना त्याची बाधा होऊ शकते. हा संसर्ग डोळे, तोंड आणि नाकाच्या माध्यमातून शरिरात पसरतो. 

हे वाचा - लस नेमकं कशी काम करते? जाणून घ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

बर्ड फ्लूच्या या ससंर्गातून वाचण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नयेत. तसंच कमी शिजलेलं चिकन खाणं टाळावं. पक्ष्यांच्या थेट संपर्कात येऊ नये. मांस उघडे ठेवू नये तसंच असं मांस खाणंही टाळावं. याशिवाय मृत पक्षी हाताला ग्लोव्हज न घालता थेट उचलू नयेत. 

आरोग्यविषयक बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सर्वसामान्य तापासारखीच बर्ड फ्लूची लक्षणे आहेत. एच5एन1 हा संसर्ग पक्ष्यांच्या फुफ्फुसाला होतो. त्यामुळे न्युमोनियाचा धोका निर्माण होतो. अशावेळी धाप लागणे, घशात खवखवणे, ताप वाढणे, अंग दुखी, पोटदुखी, छातीत दुखणे असे त्रास होतात.