ड्राय फ्रूट्सपेक्षा काळे चणे अधिक फायदेशीर; वाचा फायद्यांबद्दल

ड्राय फ्रूट्सपेक्षा काळे चणे अधिक फायदेशीर; वाचा फायद्यांबद्दल

नागपूर : काळे चणे हे आरोग्यासाठी फार चांगले असतात. यात आयर्न, सोडिअम व सेलेनिअम यांचा मुबलक साठा असतो. याचे सेवन केल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. रात्रभर भिजवून आणि मोड आणून हरभरे खाल्ल्यास व्हिटॅमिन आणि बी कॉम्प्लेक्सचे प्रमाणही सुधारते. चण्यातील प्रोटीन घटक शरीरातील ऊर्जा वाढवतात व अमायनो ॲसिडमुळे पेशींचे नुकसान टळते.

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी व बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी अनेकजण बदाम खातात. परंतु, बदामाची किंमत जास्त असल्यामुळे सगळ्यांनाच दररोज बदाम खाणे शक्य होत नाही. बदामात असणारे सर्व घटक आपल्याला चण्यात सहज मिळतात. हरभऱ्यामध्ये प्रोटीन, फायबर, खनिजे, व्हिटॅमीन आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळेच बदामाप्रमाणे रात्री हरभरे भिजवून सकाळी खाल्ल्याने अनेक समस्या दूर होतात.

देशी हरभरा हा न्यूट्रिएंट्सबाबत बदामासारख्या महागड्या ड्राय फ्रूट्सपेक्षा अधिक फायदेशीर असतात. भिजलेल्या चण्यात प्रोटीन, फायबर, मिनरल आणि व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असते. यामुळे बऱ्याच आजारांपासून तसेच निरोगी राहण्यास मदत होते. चणे आपण कधी उकळवून, कधी अंकुरित करून आणि कधी भाजीपालात टाकून खातो. चला तर जाणून घेऊया काळे चणे खाण्याच्या फायदे...

ड्राय फ्रूट्सपेक्षा काळे चणे अधिक फायदेशीर; वाचा फायद्यांबद्दल
विचार केलाय? सायबर गुन्हेगारांकडे मोबाईल नंबर येतो कुठून?

किडणीच्या समस्यांना उपयुक्त

ज्या लोकांना किडणी संबंधित समस्या असतील त्यांनी नियमित चण्याचे सेवन करायला हवे. याचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त मीठ काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे किडणीचे आरोग्य चांगले राहते.

वजन करते कमी

काळ्या चणे खाल्याने पोट जास्त काळ भरून राहते. यामुळे दुसरे काहीही खायची इच्छा होत नाही. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

कोलेस्टेरॉलची पातळी करतो कमी

काळ्या चण्यामध्ये विद्राव्य फायबर असते. याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.

ड्राय फ्रूट्सपेक्षा काळे चणे अधिक फायदेशीर; वाचा फायद्यांबद्दल
पर्यायी कार्यक्रमांची काँग्रेसची परंपरा कायम

केस करते डाट

काळे चणे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्तम स्त्रोत आहे. याचे सेवन केल्याने केस डाट होतात. यात मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने केसांचे रोम मजबूत ठेवतात आणि केस गळणे थांबते.

हृदय राहते निरोगी

काळ्या चण्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात. याचे सेवन केल्याने रक्तवाहिन्या निरोगी राहतात. यात फोलेट आणि मॅग्नेशिअम असल्याने हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कमी होतो.

पचन क्रिया सुधारते

काळ्या चण्याने पाचन तंत्र सुधारण्यास मदत होते. हे शरीराला डिटॉक्स करते आणि पाचन प्रणाली निरोगी ठेवते. बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या पाचन समस्येवर याचे सेवन केल्यास मात करता येते.

ऊर्जेत होते वाढ

सकाळी मूठभर भिजवलेले काळे चणे खाल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते. नियमित सेवन तुम्हाला मजबूत बनवते आणि शरीराची कमजोरी टाळते.

ड्राय फ्रूट्सपेक्षा काळे चणे अधिक फायदेशीर; वाचा फायद्यांबद्दल
भेदरलेल्या हरिणींसारखी वारांगनांची गत; चिमुकले दुधापासून वंचित

रक्तातील साखर राहते नियंत्रणात

काळ्या हरभऱ्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. काळ्या हरभऱ्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट पचन कमी करते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. काळ्या हरभऱ्यातील कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेची पातळी कमी करतात आणि टाइप -२ मधुमेहाचा धोकाही कमी करतात.

कफ कमी होण्यास मदत

भिजलेल्या चण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. त्यामुळे पचन क्रिया सुधारून पोट साफ होण्यास मदत होते. तसेच भिजलेले चण्याच्या सेवनाने कफ कमी होतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com